‘आरटीई’ अंतर्गत प्रवेश प्रक्रिया नोंदणीला प्रारंभ; 27 जानेवारीपर्यंत Online अर्ज करण्याची सुविधा

0
10

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्रात शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिक दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळांमध्ये मोफत शिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या वर्षी 14 जानेवारी 2025 पासून आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शिक्षा विभागाने शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी इंग्रजी शाळांमध्ये पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश देण्याची योजना राबविली आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी शाळांनी 18 डिसेंबर 2024 पासून नोंदणी प्रक्रिया सुरू केली होती, ज्यासाठी 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, अपेक्षित नोंदणी न झाल्याने प्राथमिक शिक्षण संचालनालयाने 4 जानेवारी 2025 पर्यंत मुदतवाढ दिली होती. तांत्रिक अडचणींचा निपटारा होऊनही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

पालकांना या प्रवेश प्रक्रियेसाठी 27 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी पालकांना student.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. तिथे रजिस्ट्रेशन केल्यानंतर, पालकांना त्यांच्या मुलांच्या माहितीसह आवश्यक दस्तावेज़ अपलोड करावे लागतील. प्रत्येक पालकाला त्यांच्या मुलांसाठी 10 आवडीच्या शाळा निवडण्याची सुविधा देण्यात आली आहे.