तुम्ही खरंच पर्यावरण कर भरलाय का? कराडला मागील वर्षी ‘इतका’ लाख पर्यावरण कर वसूल

0
6

कराड प्रतिनिधी । संतोष गुरव

वाहने १५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याची पुनरनोंदणी करणे अनिवार्य असते, परंतु अनेक वाहनधारक ही जबाबदारी पार पाडत नाहीत. या पुननोंदणी प्रक्रियेत पर्यावरण कर (Environment Tax) भरणे आवश्यक असते, परंतु ग्रामीण भागात असंख्य वाहनधारक या कराची वसुली करण्याकडे दुर्लक्ष करतात. सातारा जिल्ह्यातील तब्बल 8 हजार 576 वाहने पर्यावरण कर न भरता रस्त्यावर धावत असून या वाहन चालकांनी परिवहन विभागाचा 2 कोटी 62 लाख रुपयांचा पर्यावरण कर थकविला आहे. तर पर्यावरण कर वसूलीमध्ये मागील वर्षी कराडच्या उपप्रदेशीक परिवहन कार्यालयाने ४६ लाख ७१ हजार एवढा कर वसूल केला आहे.

वाहनाची वयोमर्यादा १५ वर्षांची असल्याने १५ वर्ष होण्यापूर्वीच संबंधित वाहनाची उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून पुनर्नोदणी करून घेणे आवश्यक असते. पुन्रनोंदणी करताना इतर कर, कागदपत्रांसह पर्यावरण कर भरून घेतला जातो. हा कर भरल्याशिवाय वाहनाची पुनर्नोदणी होत नाही. त्यामुळे वाहनाची पुनर्नोदणी तथा पासिंग करून घेताना पर्यावरण कराच्या रूपात काही रक्कम ऑनलाइन भरून घेतली जाते. वाहनाच्या प्रकारानुसार ही रक्कम आकारली जाते.

हा कर न भरता वाहन रस्त्यावर चालविल्यास संबंधितावर कारवाई होते. तसेच पुन्हा व्याजासह पर्यावरण कराच्या रकमेची वसुली होते. त्यामुळे वाहनधारकांनी हा कर पुननौंदणीवेळी भरणे बंधनकारक आहे. मात्र, असंख्य वाहनधारक आपल्याला कोण विचारतंय, असा समज करून घेऊन १५ वर्षे झाल्यानंतरही कोणत्याही प्रकारची नोंदणी करत नसल्याचे समोर येत आहे.

सातारा जिल्ह्यातील तब्बल 8 हजार 576 वाहने पर्यावरण कर न भरता रस्त्यावर धावत आहेत. या वाहन चालकांनी परिवहन विभागाचा 2 कोटी 62 लाख रुपयांचा पर्यावरण कर थकविला आहे. ज्या वाहनांचा पर्यावरण कर भरला नाही. अशांना नोटिसा पाठविण्याचे आदेश राज्यातील सर्व परिवहन कार्यालयांना देण्यात आले आहेत.

मागील वर्षी 46 लाख 71 हजार एवढा पर्यावरण कर वसूल : विंदा गुरावे

पर्यावरण कर वसुलीबाबत सांगायचे झाले तर मागील वर्षी २०२४ मध्ये ५४९ वाहनांची कर वसुली झाली आहे. या वसुलीमध्ये संबंधित वाहनांच्या वाहनधारकांकडून ४६ लाख ७१ हजार एवढा कर कराडच्या परिवहन विभागाच्या कार्यालयाने वसूल केला असल्याची प्रतिक्रिया उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कराड श्रीमती विंदा गुरावे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.

पर्यावरण कर म्हणजे कायं रं भाऊ?

राज्य सरकारने २०१० पासून पर्यावरण कर आकारण्यास सुरुवात केली आहे. वाहन निर्मितीस १५ वर्षे पूर्ण झाली असतील तर हा कर भरावा लागतो. हा कर पाच वर्षासाठी ग्राह्य असतो.

आरटीओकडून 58 लाख रुपये वसुली

कराडच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने 2023 मध्ये शेकडो वाहनांची पुनर्नोदणी केली आहे. त्यातून सुमारे ५८ लाख रुपये एवढा पर्यावरण कर जमा झाला होता. सध्याही वाहनांच्या पुननोंदणीचे काम सुरू असून त्याद्वारे पर्यावरण कर जमा होत आहे.

मुदतीपूर्वी कर भरल्यास व्याजासह वसुली

पंधरा वर्षापेक्षा जुन्या असलेल्या वाहनांच्या पुननोंदणीसाठी प्रादेशिक परिवहनकडून वेळोवेळी आवाहन केले जाते. त्याला काहीसा प्रतिसाद मिळतो. मात्र, वाहनाची पुनर्नोदणी करण्यास तसेच पर्यावरण कर भरण्यास अनेक वाहनधारक टाळाटाळ करतात. त्यामुळे हा कर वेळेत भरला नाही तर दोन टक्के महिन्याला व्याज आकारणी केली जाते.

कोणत्या वाहनाला किती असतो कर?

दुचाकी : १५०० रु.
तीन चाकी : ७५० रु.
चारचाकी पेट्रोल : ३००० रु.
चारचाकी डिझेल : ३००० रु.

पुननोंदणी आणि पर्यावरण कर

प्रत्येक वाहनाची वयोमर्यादा १५ वर्ष निर्धारित असल्याने ही मर्यादा पूर्ण झाल्यानंतर वाहनाची पुननोंदणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून करून घेणे आवश्यक असते. या प्रक्रियेत वाहनधारकाला इतर कर, कागदपत्रांसह पर्यावरण कर देखील भरावा लागतो. हा कर न भरल्यास वाहनाची पुनर्नोदणी होत नाही आणि वाहन रस्त्यावर चालविल्यास परिवहन अधिकाऱ्यांकडून कारवाई होते.

कारवाई आणि व्याजासह वसुली

पर्यावरण कर न भरता वाहन रस्त्यावर चालविल्यास संबंधित वाहनधारकावर कारवाई केली जाते. याशिवाय, पुन्हा व्याजासह पर्यावरण कराच्या रकमेची वसुली देखील केली जाते. वाहनाच्या प्रकारानुसार ही रक्कम आकारली जाते, मात्र अनेक वाहनधारक आपल्याला कोण विचारतंय, असा समज करून घेऊन १५ वर्षे झाल्यानंतरही कोणत्याही प्रकारची नोंदणी करत नाहीत.