दरे गावी मुक्कामी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली पर्यटन व विकास कामांची आढावा बैठक; दिल्या ‘या’ सूचना

0
2

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात उत्तरेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात त्यांनी दर येथे जिल्ह्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. ही बैठक तापोळा, कोयना आणि महाबळेश्वर परिसरात सुरू असलेल्या व प्रस्तावित पर्यटन व इतर विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आली होती.

तापोळा, कोयना आणि महाबळेश्वर परिसरात पर्यटन विकासाची कामे सुरू आहेत, तसेच काही नवीन प्रस्तावित कामे देखील आहेत. या कामांना गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत पोलीस अधीक्षक समीर शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक किरण जगताप यांच्यासह विविध तालुक्यातील तहसीलदार, प्रांताधिकारी व पर्यटन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्ह्यातील विविध विकास कामांचा विस्तृत आढावा घेतला. त्यांनी अधिकाऱ्यांना या कामांच्या प्रगतीची माहिती देण्याचे निर्देश दिले आणि आवश्यक ते मार्गदर्शन केले. या बैठकीने जिल्ह्यातील पर्यटन विकास आणि इतर विकास कामांना नवीन ऊर्जा मिळाली आहे.