राजस्थानात घर अन् पुण्यात फ्लॅट घेण्यासाठी पैशाची मागणी करत पत्नीचा छळ; कुरुंदवाडच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा

0
5
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । कोल्हापूरच्या जयसिंगपूर भागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एका विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला आणि तिला ठार मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणात कुरुंदवाड नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी आशिष बाबूसिंग चौहान, सासू मीना चौहान, सासरा बाबूसिंग चौहान (सर्व रा. उंब्रज, ता. कराड, जि. सातारा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजस्थान येथे घर व पुणे येथे फ्लॅट घेण्याकरिता पैशाची मागणी करून व विवाहितेचा मानसिक छळ करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विशाखा आशिष चौहान (वय ३५, मूळ गाव मसूर, ता. कराड, सध्या रा. महावीर कॉलेजच्या पाठीमागे कोल्हापूर) ज्या सध्या कोल्हापूरच्या महावीर कॉलेजच्या पाठीमागे राहतात. त्यांनी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, सन २०१९ ते १४ जुलै २०२४ या कालावधीत तिच्यावर वेळोवेळी मानसिक व शारीरिक छळ केला गेला. विशाखा यांच्या आईकडून राजस्थानात घर घेण्यासाठी व पुण्यात फ्लॅट घेण्यासाठी दीड ते दोन लाख रुपये मागितले गेले. शिवाय, तिला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली गेली.

मूळगावी राजस्थान येथे घर घेण्यासाठी व पुणे येथे फ्लॅट घेण्याकरिता तक्रार यांच्या आईकडून दीड ते दोन लाख रुपये घेतले. शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. विशाखा यांच्या तक्रारीनंतर जयसिंगपूर पोलिसांनी चौहान यांच्यासह सासू व सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक नव्हती