पुणे-बंगळूर महामार्गावरील कराडनजीक पुलाचे काम ठप्प; DP जैन कंपनीच्या 700 कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन

0
7
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणांतर्गत कोल्हापूर नाक्यावरून नांदलापूरदरम्यान उड्डाणपूल उभारण्याचे काम गेल्या अनेक महिन्यापासून सुरू आहे. डीपी जैन कंपनीच्या तब्बल ७०० कर्मचाऱ्यांकडून हे काम केले जात असून त्यांनी आज बेमुदत काम बंद आंदोलनास सुरुवात करीत अचानक काम बंद पाडले. जो पर्यंत कंपनीकडून मागण्या तत्काळ मान्य केल्या जात नाही तोपर्यंत काम बंद ठेवणार असल्याचा पावित्रा कर्मचाऱ्यांनी घेतल्याने पुलाचे पाच ते सहा ठिकाणी सुरु असलेले काम ठप्प झाले आहे.

आज सोमवारी सकाळी कराड उड्डाणपूल, कोयना नदीवर उभारण्यात येणार पूल आणि धोंडेवाडी (ता. कराड) येथील कंपनीच्या कास्टिंग यार्डवरील कामगारांनी अचानक काम बंद करत एकत्रित आले. प्रलंबित पगार आणि नऊ महिन्यांची पीएफची रक्कम तत्काळ कंपनीने द्यावी जो पर्यंत दोन मागण्या पूर्ण करत नाही तो पर्यंत आम्ही काम बंद ठेवणार असल्याचे कामगारांनी सांगितले आहे.

डीपी जैन कंपनीने कामगारांना नऊ महिन्यांच्या पीएफ दिलेला नाही. याची जवळपास तीन कोटी रुपये रक्कम होत असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. तसेच कामगारांच्या हक्काचे पैसे इतरत्र वापरून त्यावर नफा कमावण्याचा कंपनीचा उद्देश असल्याचीही चर्चा कामगारांमध्ये सुरु आहे.

कोल्हापूर नाक्यावरून नांदलापूरदरम्यान सुमारे साडेतीन किलोमीटरच्या युनिक उड्डाणपुलाच्या ९२ पिरलवर हा पूल उभारण्यात येत आहे. त्यापैकी मलकापूर परिसरातील आणि कोल्हापूर नाक्यापर्यंतच्यापिलरवर सेगमेंट बसवण्याचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. मात्र, अद्यापही काही काम बाकी आहे. त्यामुळे मुदतीत काम पूर्णत्वाचे आव्हान ठेकेदारांपुढे उभे आहे. अशात कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे काम वेळेत शक्य होणे अवघड झाले आहे.

कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागणी काय?

१) डीपी जैन कंपनीने नऊ महिने झाले तरीही पीएफ दिलेले नाहीतो तत्काळ द्यावा
२) दोन महिने झाले एक महिन्याचा पगार दिलेला तो द्यावा
३) एक महिन्याचा पगार त्यांच्याकडे स्टॉक करून ठेवला आहे हि पद्धत बंद करावी

कामगारांचे तिसऱ्यांदा काम बंद आंदोलन

रस्ते, महामार्ग आणि उड्डाणपुल निर्माण करणारी डीपी जैन ही कंपनी भारतातील नामांकित कंपनी आहे. त्यामुळे पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामाचा ठेका सरकारतर्फे या कंपनीला देण्यात आला. त्यानुसार गेल्या वर्ष, दीड वर्षांपासून पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणांचे काम सुरु आहे. त्यांतर्गत कराड शहरालागत सहापदरी उड्डाणपुल उभारानिचेही काम सुरु असून त्याचे जवळपास ८० टक्के काम पूर्णत्वास आले आहे. या महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामासाठी कंपनीचे इंजिनीअर, ड्रायव्हर, ऑपरेटर व अन्य कामगार कार्यरत आहेत. मात्र, कंपनीकडून हातावर पोट असलेल्या कामगारांची पिचावणूक केली जात असल्याने अनेकदा समोर आले आहे. गत वर्षभरात कामगारांनी तिसऱ्यांदा काम बंद आंदोलन केले आहे.