महाराणी येसूबाई यांची समाधी ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित

0
70
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांची समाधी राज्य शासनाने ‘संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित केले आहे.

या महत्त्वपूर्ण विषयाची अंतिम अधिसूचना ८ जानेवारी या दिवशी राज्य शासनाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आली, अशी माहिती माजी उपनगराध्यक्ष तथा ‘महाराणी येसूबाई फाऊंडेशन’चे संकल्पक सुहास राजेशिर्के यांच्यावतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

स्वराज्याच्या जडणघडणीमध्ये कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांचे अभूतपूर्व योगदान आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानानंतर महाराणी येसूबाई यांनी २९ वर्षे शत्रूच्या नजरकैदेत काढली होती. ही समाधी ‘राज्य संरक्षित स्मारक’ घोषित झाल्यामुळे या परिसराच्या आणि समाधीच्या विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

राजधानी साताऱ्यातील माहुली हे गाव धार्मिक अंगाने प्रसिद्ध आहे. मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक महत्त्वाच्या व्यक्ती महाराणी येसूबाई यांची समाधीदेखील माहुलीतच आहे. आजपर्यंत अनेक इतिहास अभ्यासकांनी त्यांच्या स्थाननिश्चितीसाठी प्रयत्न केले आहे.