पाल यात्रेसाठी एसटी सज्ज; सर्व आगारातून 140 जादा बसेस सोडण्यात येणार

0
3
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | पाल, ता. कराड येथील खंडोबा यात्रेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा सातारा विभाग सज्ज झाला आहे. सातारा विभागातील सर्व आगारातून 140 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

पाल यात्रा दि. 10 ते 17 जानेवारीअखेर होणार असून यात्रेचा मुख्य शनिवार दि. 10 जानेवारी रोजी आहे. यात्रेसाठी राज्यासह अन्य राज्यातील भाविक मोठ्या संख्येने येत असतात. यात्रेमध्ये भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी एसटीचा सातारा विभाग सज्ज झाला आहे.

यात्रेसाठी कराड आगाराचे आगार व्यवस्थापक विक्रम हांडे यांची यात्राप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सातारा 20, कराड 25, कोरेगाव 12, फलटण 10, वाई 12, पाटण 12, दहिवडी 10, महाबळेश्वर 8, मेढा 15, पारगाव खंडाळा 6, वडूज 10 अशा मिळून 140 जादा बसेस यात्रा कालावधीत धावणार आहेत. यात्रेसाठी वरिष्ठ अधिकारी व कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तसेच यात्रा शेड उभारण्यात आले असून त्याठिकाणीही अधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी जादा एसटी बस सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे.