कराड प्रतिनिधी । कराड येथील यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स महाविद्यालयात आयोजित ५२ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा आज समारोप झाला. यावेळी समारोपास उपस्थित प्रमुख पाहुणे मा. प्रा. डॉ . व्ही एस राव यांनी “विज्ञान हा आजच्या आधुनिक जीवनाचा अविभाज्य भाग असून, मानवाला सर्व क्षेत्रात प्रगती साधून चांगले सहज जीवन जगण्यासाठी विज्ञानाची आवश्यकता आहे. विज्ञानामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचा, सृजनशीलतेला, विकास होत असतो. देशाचे भवितव्य घडविणारे बालवैज्ञानिक अशाच प्रदर्शनातून पुढे येतील,असा विकत केला.
यावेळी आयोजित समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन, जनरल सेक्रेटरी, श्री शिवाजी शिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी श्रीमती शबनम मुजावर, उपशिक्षणाधिकारी श्री. तेजस गबंरे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी डॉ. व्ही .एस. राव म्हणाले की, विज्ञान प्रदर्शनामध्ये भाग घेणे महत्त्वाचे असते. विज्ञानाची गोष्ट तळागाळापर्यंत ,प्रत्येक खेडेगावमध्ये पोहचली पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांची कल्पकता व नव-नाविन्यता जोपासले आहे. उद्याचे तुम्ही मोठे शास्त्रज्ञ होणारा आहात. तुम्ही सर्वांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासली पाहिजे.
यावेळी याशनी नागराजन म्हणालया की, तुम्ही सर्वजण विजेते आहात. तुम्ही सर्वजण उद्याचे संशोधक आहात. असे चांगले काम करत राहा. विद्यार्थ्यांनी त्यांच्या नवकल्पनांची सुस्पष्टता आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून बघावे. खेडेपाड्यातील तसेच भारतातील लोकांना तुमचा प्रयोगाचे लाभ मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विज्ञान प्रदर्शन हा एक मेळावा असतो प्रत्येक उपकरणं चांगले आहे. तुम्हाला या प्रदर्शनातून प्रेरणा मिळते. वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाला पाहिजे. विज्ञानामुळे संशोधक होता आले नाही तरी चालेल, परंतु त्यासाठी चांगले योगदान मिळावा हेतू हा विज्ञान प्रदर्शनाचा असतो. खेडेपाड्यातील विद्यार्थ्यांना या विज्ञान प्रदर्शनामुळे मार्गदर्शन मिळते.
दिव्यांग विद्यार्थ्यांनी घेतला जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग
या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये प्राथमिक विद्यार्थी ३३ व ७ दिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच माध्यमिक विद्यार्थ्यांनी ३६ व दिव्यांग ६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. तसेच प्राथमिक शिक्षक ११, माध्यमिक शिक्षक ११ व ७ प्रयोगशाळा सहाय्यक परिचर यांनी या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदवला.
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनातील विजेते प्राप्त विद्यार्थ्यांची नावे खालीलप्रमाणे…
उच्च प्राथमिक गट : प्रथम क्रमांक १) रुद्र संजय बरकडे (श्री कोटेश्वर विद्यालय, गोवे, प्रकल्पाचे नाव-मुजरांसाठी बहुउद्देशीय यंत्र) द्वितीय क्रमांक,२) स्नेहा संदीप चव्हाण, (पी.एम. श्री. कराड नगरपालिका शाळा क्रमांक ३, प्रकल्पाचे नाव- हवेची गुणवत्ता दर्शविणे) तृतीय क्रमांक, ३) गौरीशंकर पाटील (जि .प .शाळा बीबी, प्रकल्पाचे नाव- इको फ्रेंडली खादान्य सुरक्षा गोळी) उत्तेजनार्थ सुमित संदीप शिंदे (स.गा.म प्राथ. विद्यामंदिर ,सैदापूर, प्रकल्पाचे नाव पीजो इलेक्ट्रिक्स शूज) प्राथमिक गटामध्ये दिव्यांगटात प्रथम क्रमांक विघ्नेश विक्रम दरेकर(भारत विद्या मंदिर संभाजीनगर, सातारा, प्रकल्पाचे नाव-दिव्यांग मित्र) उत्तेजनार्थ कार्तिक प्रदीप जाधव (कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, धामणेर, प्रकल्पाचे नाव-ट्री गार्ड)
उच्च माध्यमिक गट : विद्यार्थी गटामध्ये प्रथम क्रमांक १)अदीबा जहांगीर तांबोळी(कमला निमकर बाल भवन फलटण), द्वितीय क्रमांक२) ऋषिकेश प्रशांत चव्हाण(अनंत इंग्लिश स्कूल सातारा), तृतीय क्रमांक ३) सिद्धेश चंद्रकांत सुर्वे(मोरणा विद्यालय मोरगिरी), उत्तेजनार्थ मोहम्मद अली अमीर अंबेकरी(एच .के. डी. उर्दू हायस्कूल, कराड), माध्यमिक गट दिव्यांग गटामध्ये प्रथम क्रमांक १) वशिका जगन्नाथ भोसले(ज्ञान विद्या मंदिर खेड), उत्तेजनार्थ, देवांश उमेश ढवळे(महात्मा गांधी विद्यालय उंब्रज). तसेच
प्राथमिक शिक्षक गट : प्रथम क्रमांक १) श्रीमती सुप्रिया सुभाष कार्वेकर,(जि. प. शाळा, सैदापूर) उत्तेजनार्थ, श्री. विष्णू ज्ञानू ढेबे(जि .प. प्राथमीक शाळा, चिखली). तसेच माध्यमिक शिक्षक गटामध्ये प्रथम क्रमांक १) सौ उर्मिला. व्ही. नाचणे(यशवंतराव चव्हाण विद्यालय पिंपोडे), उत्तेजनार्थ, श्री. प्रकाश कलाप्पा कांबळे(भवानी विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज). व प्रयोगशाळा सहाय्यक परिचर गटामध्ये प्रथम क्रमांक १) श्री पांडुरंग नाथा गायकवाड,(सद्गुरु माध्यमिक आश्रमशाळा ,शेरे) उत्तेजनार्थ, श्री तात्याबा मारुती नाळे(स.म. हनुमंतराव पवार हायस्कूल, फलटण) या विजेत्या सहभागांची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.