कराड प्रतिनिधी | महामार्ग ओलांडणारा पादचारी ट्रकखाली चिरडून जागीच ठार झाल्याची दुर्घटना काल घडली. त्यातील पादचाऱ्याची ओळख पघटनास्थळावरून पसार झालेल्या चालकावर गुन्हा नोंद झाला आहे. शिवाजी महादेव शेवाळे यांनी शहर पोलिसात त्याबाबत फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर- सातारा मार्गिकेवर येथील एका हॉटेलसमोर काल रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला. स्वप्नील दिलीप थोरात (वय २८, रा. सवादे, ता. कराड) असे मृत पादचाऱ्याचे नाव आहे. स्वप्नील हा गरुड हॉस्पिटलजवळ व्हीआरएल ट्रान्स्पोर्ट येथे कामास होता. सवादे येथून मिळेल त्या वाहनाने कराड येथे कामाच्या ठिकाणी ये-जा करत होता. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे घरी आला नाही म्हणून नातेवाइकांनी त्याचा शोध घेतला.
मात्र, सापडला नाही. कोल्हापूर नाक्याजवळ अपघातातील मृताची नातेवाइकांना माहिती मिळाली. तो स्वप्नील आहे का? यासाठी नातेवाइकांनी कराड पोलिस ठाण्यात माहिती घेतली. अपघातग्रस्त पादचाऱ्याचा मृतदेह दाखवला असता तो स्वप्नील असल्याची खात्री पटली.