सातारा जिल्ह्यात 34 हजार जणांनी केलं प्रकृती परीक्षण; 22 मुद्द्यांवर आरोग्य तपासणी

0
4
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनीधी । केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रकृती परीक्षण अभियान राबविण्यात आले. सातारा जिल्ह्यात ३४ हजाराहून अधिक नागरिकांची २२ मुद्द्यांवर आरोग्य तपासणी करण्यात आली. या अभियानात जिल्ह्याचे काम कौतुकास्पद झालेले आहे. तसेच, या तपासणीदरम्यान, नागरिकांना वेळीच आहार-विहारचा सल्ला देण्यात आला.

आयुष मंत्रालय भारत सरकारच्या वतीने देशभरात ‘देश का प्रकृती परीक्षण अभियान’ राबविण्यात आले होते. या अभियानात शेठ चंदनलाल मुथा आर्यांग्ल वैद्यकीय महाविद्यालय, मायणीचे रूरल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद कॉलेज अँड हॉस्पिटल आणि जिल्हा रुग्णालय, तसेच जिल्हा परिषदेमधील शासन सेवेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत प्रकृती परीक्षण करण्यात आले.

९ ऑक्टोबरला आयुर्वेद दिवसा’च्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘देश का प्रकृती परीक्षण’ अभियानाची घोषणा केली होती. त्यानुसार आयुर्वेद अर्हताधारक प्राध्यापक, विद्यार्थी, खासगी व्यावसायिक व शासकीय सेवेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत १८ ते ७० वर्षे वयोगटातील लोकांचे प्रकृती परीक्षण करण्यात आलेले.

विशेष ॲपद्वारे केले परीक्षण

प्रकृती परीक्षणासाठी आयुष मंत्रालयाने विशेष अॅप तयार केले आहे. या अॅपवर सामान्य नागरिक आणि आयुर्वेद डॉक्टरांना लॉगिनची सोय दिली आहे.

परीक्षणानंतर पुढे काय ?

परीक्षणामध्ये आपल्या प्रकृतीनुसार आहार-विहार पथ्य आणि योग्य त्या पंचकर्म उपचारांसाठी शिफारस करण्यात येते.

काय आहे प्रकृती परीक्षण अभियान ?

९ ऑक्टोबरला आयुर्वेद दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश का प्रकृती परीक्षण अभियान जाहीर केले होते. यानुसार २५ नोव्हेंबर ते २५ डिसेंबरदरम्यान तपासणी करण्यात आली.

जिल्ह्यात 34 हजार जणांचे परीक्षण

देश का प्रकृती परीक्षण अभियानाअंतर्गत • जिल्ह्यात ३४ हजार २३१ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. प्रकृती परीक्षण अॅपवर नाव, वय आणि पूर्वीचे आजार, अशी माहिती भरल्यानंतर क्यूआर कोड येतो. त्याच्या स्कॅनिंगने २२ मुद्द्यांवर तपासणी करण्यात आली.

प्रकृती परीक्षणाबद्दलची माहिती :

  • प्रकृती म्हणजे जन्मतःच ठरलेला स्वभाव, जो आयुष्यभर स्थिर राहतो.
  • प्रकृती ही आयुर्वेदिक व्यक्तिरेखा किंवा व्यक्तीचा अनोखा मनोवैज्ञानिक स्वभाव आहे.
  • प्रकृतीमध्ये शारीरिक, कार्यात्मक आणि वर्तणूक वैशिष्ट्य समाविष्ट असते.
  • प्रकृतीची संकल्पना तिच्या मनोवैज्ञानिक दृष्टिकोनाच्या दृष्टीने अद्वितीय आहे.
  • एखाद्या व्यक्तीची प्रकृती त्याच्या शरीरातील दोष (वात, पित्त आणि कहा) च्या प्राबल्य द्वारे निर्धारित केली जाते.
  • प्रकृती परीक्षण करून आरोग्य समस्या समजून घेण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यासाठी मदत होते.
  • प्रकृती परीक्षण करून वैयक्तिकृत, प्रतिबंधात्मक आरोग्य पद्धतींचा अवलंब करता येतो