एसटी चालकांना अगोदर अवघड घाटामध्ये खडतर प्रशिक्षण; नंतरच हातात स्टिअरिंग

0
2
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । रस्त्यावर अपघात होऊ नये म्हणून वाहनाचा चालक हा पूर्णपणे वाहन चालवणारा प्रशिक्षित असणे आवश्यक असते. त्यात एसटी वाहक म्हटले तर त्याची प्रशिक्षणात अगदी काटेकोरपणे चाचणी करून घेतली जाते. मानवी चुकांमुळे एसटीचे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण खूपच नगन्य आहे. कारण चालकांना तेवढे प्रशिक्षणच दिले जाते. घाटामध्येही गाडी चालविण्याचे धडे दिले जातात.

सातारा जिल्ह्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांमुळे अनेक भागांना जोडणाऱ्या रस्त्यात घाट आहेत. यामध्ये पाचगणीकडे जाताना पसरणी घाट, महाबळेश्वरला जाताना पसरणी, केळघर, आंबेनळी घाट. कासकडे जाताना यवतेश्वर त्याचबरोबर शामगाव, सुर्ली घाट आहेत. या घाटांमध्ये नागमोडी वळणे घेत रस्ते आहेत. अनेक ठिकाणी तीव्र वळणे आहेत.

त्यामुळे राज्य परिवहन महामंडळात भरती झालेल्या चालक, चालक कम वाहकांना ठरावीक प्रशिक्षणानंतर या घाटामध्येही एसटी चालविण्यास दिली जाते. त्यामुळे या भागातून तयार होणारे चालक हे एकदम कणखर होत असतात. त्यामुळे त्यांना भावी काळात मदत होत असते. हे चालक सातारा जिल्ह्यातून कोठेही गेले तरी त्यांना कसलीच अडचण येत नसते.

एसटीचे धोरण; सुरक्षेत तडजोड नको

एसटी महामंडळ प्रवासी वाहतुकीत अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. दररोज हजारो गाड्या धावत असतात, मात्र अपघात खूपच कमी आहेत. कारण सुरक्षेत तडजोड नकोच हे एसटीचे मूळ धोरण आहे.

अपघात प्रवण पाठ्यक्रम प्रशिक्षणात काय?

प्रशिक्षणानंतरही अधिकाऱ्यांसमोर चाचणी अपघाती क्षेत्र असलेल्या भागातून गाडी कशाप्रकारे व्यवस्थित बाहेर काढायची, अशा वेळी कोणती काळजी घ्यावी आदींचे प्रशिक्षण दिले जाते.

प्रशिक्षणानंतरही अधिकाऱ्यांसमोर चाचणी

प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतरही सेवेत रुजू होण्यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर काही किलोमीटर गाडी चालविण्याची परीक्षा द्यावी लागते.

चालक पदासाठीचे निकष?

चालक पदासाठी भरती होत असताना संबंधित उमेदवाराकडे हलक्या किंवा अवजड वाहतुकीचा परवाना असावा. त्यानंतर मानवी वाहतुकीबाबत बॅच काढावा लागतो.

वाहकही आता बनताहेत चालक

लालपरी म्हणून ओळख असलेल्या एसटीमध्ये तर आता चालक कम वाहक भरती होत आहे. वाहक म्हणून तिकीट फाडणारे कंडक्टर काकाही काही वेळेनंतर एसटी चालविताना दिसत असतात. त्यामुळे प्रवाशांना भीती वाटेल, पण या कर्मचाऱ्यांना काहीच वाटत नाही.

अधिकाऱ्यांचे बारीक लक्ष…

प्रशिक्षण घेणाऱ्या चालकांना काही काळ पुस्तकी प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर त्यांना ठरावीक तास एसटीचे स्टिअरिंग वापरावे लागते. हे करत असताना प्रत्येक घडामोडींकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बारीक लक्ष असते.