सातारा प्रतिनिधी | फलटण तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत झाली. तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्या हस्ते पंचायत समितीच्या सभागृहात ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.
यामध्ये तरडगाव (सर्वसाधारण), विठ्ठलवाडी (ना. मागासप्रवर्ग), खडकी (सर्वसाधारण), मिरगाव (सर्वसाधारण महिला), गोखळी (सर्वसाधारण), खटकेवस्ती (सर्वसाधारण महिला), माळेवाडी (अनु. जाती. महिला), शिंदेमाळ (सर्वसाधारण), चांभारवाडी (ना. मागासवर्ग महिला), मिरेवाडी (अनु. जाती महिला), दालवडी (सर्वसाधारण महिला), आसू (सर्वसाधारण महिला), ढवळेवाडी आसू (सर्वसाधारण), सासवड(सर्वसाधारण), टाकोबाईचीवाडी (ना. मागासवर्ग महिला), उलुंब (ना. मागास प्रवर्ग), जोर कुरवली खुर्द (अनु. जाती महिला), परहर खुर्द (ना. मागास प्रवर्ग महिला), गोळेवाडी(सर्वसाधारण महिला), माझेरी (सर्वसाधारण) असे एकूण बावीस ग्रामपंचायत सरपंच पदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे.
या आरक्षण सोडतीसाठी निवासी नायब तहसिलदार अभिजित सोनवणे, महसूल नायब तहसिलदार तुषार गुंजवटे, लक्ष्मण अहिवळे, योगेश धेंडे, यांचेसह विविध गावाचे विद्यमान सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य सर्वपक्षिय राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते.