कराड पंचायत समितीच्या नव्या इमारतीचा कृती आराखडा ताबडतोब तयार करा; आ. डॉ. अतुलबाबांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना

0
3
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड तालुका पंचायत समितीच्या कार्यालयाच्या नव्या सुसज्ज प्रशासकीय इमारतीसाठी असलेल्या दैत्यनिवारणी देवी मंदिर परिसरातील प्रस्तावित जागेची कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले (Atul Bhosale) यांनी शासकीय अधिकाऱ्यांसमवेत नुकतीच पाहणी केली. यावेळी या नव्या इमारतीचा कृती आराखडा ताबडतोब तयार करण्याच्या सूचना आमदार डॉ. भोसले यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील, जि. प. कार्यकारी अभियंता अमर नलवडे, आर्किटेक्ट तुषार पाटील, माजी नगरसेवक हणमंतराव पवार, सूरज शेवाळे यांच्यासह अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी आमदार डॉ. भोसले म्हणाले की, कराड तालुका हा लोकसंख्येच्या आणि कामकाजाच्या दृष्टीने मोठा तालुका आहे. कराडमधील सध्याची पंचायत समितीची इमारत जुन्या धाटणीची आहे. शासकीय कामांसाठी याठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोकं येतात. अशावेळी तालुक्यातील नागरिकांना शासकीय सेवा सुलभपणे उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पंचायत समितीची प्रशासकीय इमारत सुसज्ज असणे गरजेचे आहे. यादृष्टीने पंचायत समितीशी निगडित सर्व कार्यालये एकाच ठिकाणी यावीत आणि त्या माध्यमातून नागरिकांना सुलभपणे सर्व शासकीय सेवाचा लाभ घेता यावा, यासाठी
याठिकाणी पंचायत समितीची सुसज्ज व सर्वसोयींनीयुक्त प्रशासकीय इमारत उभारल्यास पंचायत समितीचे कामकाज अधिक गतिमान होईल. तसेच नागरिकांना उत्तम सेवा मिळू शकतील.

भविष्यातील कामकाजाचा अंदाज लक्षात घेऊन, या नव्या इमारतीच्या उभारणीसाठी योग्य कृती आराखडा तातडीने तयार करावा तसेच नव्या इमारतीचा आराखडा तयार करताना त्यात नैसर्गिक सूर्यप्रकाश, कामकाजात सुलभता यावी यापद्धतीने इमारतीची अद्ययावत रचना, पार्किंगची व्यवस्था यासह अन्य अनुषंगिक सोयीसुविधांचा अंतर्भाव करावा, अशा सूचनाही आ.डॉ. भोसले यांनी केल्या.