वीज बिलाच्या थकबाकीधारकांसाठी आनंदाची बातमी; ‘अभय’ योजनेला आता 31 मार्चपर्यंत मुदतवाढ

0
3
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘अभय योजना २०२४’ ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत वीजबिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होत असल्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

महावितरणच्या ३१ मार्च २०२४ पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी १ सप्टेंबरपासून अभय योजना सुरू केली. या योजनेचा कालावधी ३० नोव्हेंबर रोजी संपल्या नंतर ३१ डिसेंबरपर्यंत एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता;

परंतु राज्यातील ग्राहकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन ही योजना ३१ मार्च २०२५ पर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय महावितरणकडून घेण्यात आल्याने ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. संबंधित वीज ग्राहकांना महावितरणच्या संकेतस्थळासह मोबाइल अॅपवरून योजनेचा लाभ घेता येईल. योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नियमित वीज कनेक्शन घेता येणार आहे.