किरकोळ कारणावरून पत्नीचा नवऱ्याने दाबला गळा, बायकोचा झाला मृत्यू; संशयित पती पोलिसांच्या ताब्यात

0
3
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील विंग गावात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून पतीने पत्नीचा गळा आवळला यामध्ये बायकोचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी संशयित पतीस ताब्यात घेतले आहे.

मयुरी मयूर कणसे (वय 27 रा. विंग ता. कराड) असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे. तर मयूर कणसे असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवार, दि. ०१ रोजी कराड तालुक्यातील विंग येथे राहत असलेल्या मयुरी कणसे व मयूर कणसे या पती-पत्नीत किरकोळ कारणावरुन वाद झाला. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून पती मयूर कणसे याने पत्नी मयुरी हिचा गळा आवळला. यामध्ये मयुरी कणसे यांचा मृत्यू झाला.

दरम्यान या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी भेट दिली. याबाबत कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी संशयित पती मयूर कणसे याला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.