नवीन रास्त भाव दुकानांबाबत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केले ‘हे’ महत्वाचे आवाहन

0
5
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हयातील कार्डधारकांची होणारी गैरसोय दूर करण्याकरीता 122 गावांमध्ये नवीन रास्त भाव दुकाने प्राधान्यक्रमानुसार मंजुर करण्याच्या दुष्टीने जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला आहे. नवीन रास्त भाव दुकानाच्या मंजूरीकरीता दि. 1 जानेवारीपासून 31 तारखेपर्यंत आवश्यक त्या कागदपत्रांसह तहसिलदारांकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी केले आहे.

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनानुसार नवीन रास्त भाव दुकानाच्या मंजूरीकरीता संबंधित ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचतगट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महिलांच्या स्वयंसहाय्यता बचतगट व महिलांच्या सहकारी संस्था यापैकी ज्यांना अर्ज करावयाचे असतील, त्यांनी संबंधित तहसिल कार्यालय, पुरवठा शाखा यांचेकडे संपर्क साधने आवश्यक आहे.

नवीन रास्तभाव दुकान प्राधान्यकमानुसार मंजूरी करीता सातारा तालुक्यातील 10 गावे, वाई तालुक्यातील 17 गावे, कराड तालुक्यातील 7 गावे, महाबळेश्वर तालुक्यातील 44 गावे, कोरेगाव तालुक्यातील 10 गावे, खटाव तालुक्यातील 9 गावे, फलटण तालुक्यातील 4 गावे, पाटण तालुक्यातील 7 गावे, माण तालुक्यातील 5 गावे, खंडाळा तालुक्यातील 9 गावे, अशा एकूण 122 गावांचा समावेश आहे. विहीत मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नसल्याचे देखील म्हटले आहे.