घराच्या वाटणीच्या वादातून झाला वाद; नातवांनी डोक्यात घातलेल्या कुऱ्हाडीच्या घावात आजोबांचा जागीच मृत्यू

0
2

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. घराची वाटणी करुन द्या या वादातून दोघा नातवांनी आजोबाच्या डोक्यावर कुऱ्हाडीचा घाव घातला. तर एकाने दगड मारला आहे. दोघा नातवांनी केलेल्या हल्ल्यात आजोबाचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी लोणंद पोलिसांनी दोघा नातवांना ताब्यात घेतले.

सावता सरस्वती काळे (वय ७५ रा. सालपे, ता. फलटण) असे जागीच मृत्यू झालेल्या आजोबांचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सालपे, ता. फलटण येथील फिर्यादी मिथुन काज्या काळे याचे आजोबा सावता काळे यांचा फिर्यादीचे सावत्र भाऊ दत्ता काळे, महेश राजा काळे (वय १९, दोघे रा. सालपे ता. फलटण) तसेच दत्ता यांचा सासरा अमित लवऱ्या शिंदे, (वय ३५, रा. मोड ता. खटाव) यांचा घराच्या वाटणीवरून वाद झाला.

वादातून दत्ता काळे याने सावता काळे यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून गंभीर जखमी केले व महेश काळे याने दगड मारला. यात सावता काळे यांचा जागीच मृत्यू झाला. याबातची फिर्याद मिथुन काळे याने लोणंद पोलिसांत दिली. सहायक पोलिस निरीक्षक सुशिल भोसले यांनी घटनास्थळी भेट देत तपास केली. तर, गुन्हातील आरोपी महेश काळे व अमित काळे या दोघांना ताब्यात घेतले. घटनास्थळी सातारा येथून फॉरेन्सिक टीमही दाखल झाली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशील भोसले करीत आहेत.