उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शेतातून मारला फेरफटका; फळांच्या झाडांची केली बारकाईने पाहणी

0
43
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | नुकतीच राज्याच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता झाली आहे. त्यानंतर राज्यातील मंत्रिपदाचे खाते वाटप करण्यात आल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपला मुलगा खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह तीन दिवसांच्या दौर्‍यावर महाबळेश्र्वर तालुक्यातील दरे तर्फ तांब ठिकाणी रविवारी सायंकाळी दाखल झाले. उपमुख्यमंत्री शिंदे यांचे हेलिकॉप्टर सायंकाळी गावानजीक केलेल्या हेलिपॅडवर उतरले. त्यानंतर आज सकाळी शिंदे यांनी आपल्या शेतात जाऊन मागील वर्षी लागवड केलेल्या फळांच्या झाडांची व पिकांची बारकाईने पाहणी केली.

एकनाथ शिंदे यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री असताना मागील महिन्यात देखील आपल्या दरे या गावी हजेरी लावली होती. मात्र, यावेळेस उपमुख्यमंत्री म्हणून प्रथमच आपल्या गावी आले आहेत. विश्रांतीच्या दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी आपल्या शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. सध्या सातारा जिल्ह्यात सकाळच्यावेळी दाट धुके पडत असल्याने या धुक्याचा परिणाम पिकांवर तसेच फळांवर देखील होत आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या शेतात मागील वर्षी फळझाडे लावली आहेत. त्यांच्याबाबत आज शेतातील मजुरांकडून त्यांनी माहिती जाणून घेतली. सध्या कॅबिनेट मंत्री पदाची शपथ व विविध खात्यांची जबाबदारी स्वीकारल्यानंतर विद्यमान आमदार, मंत्री आपापल्या मतदार संघात परतत आहेत. सातारा जिल्ह्यातील चार मंत्री देखील मतदार संघात आले असून पाचवे एकनाथ शिंदे हे काल आपल्या दरे या गावी दाखल झाले आहेत. दरम्यान, शेन्डे यांच्याकडून आज सकाळी व दिवसभरात शेतातील पिकांची, फळझाडांची पाहणी करण्यात आली.