केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केलेल्या वक्तव्याविरोधात साताऱ्यात संविधान गौरव परिषद, संविधानप्रेमींकडून मुकधरणे आंदोलन

0
32
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा येथील संविधान गौरव परिषद व सर्व संविधानप्रेमी यांच्यावतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत केलेल्या निंदनीय वक्तव्याविरोधात छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आज मूक आंदोलन करण्यात आले.

यावेळी अस्लम तरडसरकर, पार्थ पोळके,चंद्रकांत खंडाईत, अशोक भोसले, डी. एस.भोसले, परवेज सय्यद, वामन मस्के, चंद्रकांत मस्के,अंकुश धाइंजे, प्रकाश खटावकर, प्रकाश तासगावकर, सतिशराव माने, विजय मोरे,नंकुमार काळे, बी. एल.माने,जगदीश गायकवाड, सुभाष सोनावणे, भरत लोकरे, सुरेश कोरडे, प्रमोद क्षीरसागर, प्रा.दत्तात्रय जाधव, ऍड. हौसेराव धुमाळ, भगवान रणदिवे, कुमार गायकवाड, गणेश कारंडे, अनिल वीर आदी संविधान प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी निंदाजनक ठराव मंजूर करून मुख्यमंत्र्यानी केंद्राकडे सादर करावा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माफी मागून राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली तसेच मागण्यांच्या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.