उमेदवारांनो, खर्चाचा तपशील द्यायला राहिलेत शेवटचे सहा दिवस बाकी; तपशील न दिल्यास याल अडचणीत..!

0
2
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुका पार पडल्या आता प्रत्येक उमेदवाराला प्रचारात केलेल्या खर्चाचे तपशील द्यावे लागणार आहेत. प्रचारासह उमेदवारांना कोणत्या वस्तू, जेवणावर किती खर्च करता येईल याची दरसूची आयोगाने जारी केली होती. त्यानुसार प्रत्येक उमेदवारासाठी खर्च मर्यादा ४० लाखांपर्यंत होती. निवडणूक लागल्यापासून दिलेल्या मुदतीत खर्च तपशील सादर न केल्यास निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. खर्च सादर न केल्यास निवडणूक लढविण्यावर बंदी येते. निवडणुकीच्या रणधुमाळीत केलेल्या खर्चाची माहिती निर्धारित वेळेत सादर न केल्यास निवडणूक लढविण्यावर आयोगाच्या नियमाप्रमाणे बंदी येते. दरम्यान, खर्चाचा तपशील सादर करण्यास शा दिवस बाकी राहिले आहेत.

23 डिसेंबरपर्यंत द्यावा लागेल तपशील

सातारा जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदारसंघांत १०९ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते. त्यांना निकाल लागल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत म्हणजेच २३ डिसेंबरपर्यंत खर्चाचा तपशील निवडणूक विभागाकडे द्यावा लागेल. निवडणूक विभागाकडून देण्यात आलेल्या मुदतीत खर्चाचा तपशील न दिल्यास संबंधित उमेदवारावर कारवार्ड होऊ शकते.

कोणत्या मतदारसंघातून किती लढले?

फलटण : १४
वार्ड : १५
कोरेगाव : १७
माण : २१
कराड उत्तर : १५
कराड दक्षिण : ०८
पाटण : ११
सातारा : २०
एकूण : १०९

जिल्ह्यात १०९ उमेदवारांनी लढविली निवडणूक

जिल्ह्यात १०९ उमेदवारांनी विधानसभा निवडणूक लढविली. त्यातील ९४ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. यामध्ये अनेक पक्षांच्या उमेदवारांचाही समावेश आहे.