साताऱ्याला मिळाली 4 कॅबिनेट मंत्रिपदे; शंभूराज देसाई, शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार, मकरंद पाटलांनी घेतली शपथ

0
2
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज नागपूरच्या राजभवनात पार पडला. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आज १६ डिसेंबरपासून सुरू होत असताना एक दिवस आधी हा शपथविधी सोहळा घेण्यात आला. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये चार कॅबिनेट मंत्रिपदे मिळवत सातारा जिल्हा राज्यात आघाडीवर राहिला. आमदार शंभूराज देसाई, शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे व मकरंद पाटील यांनी आज सायंकाळी नागपूरमध्ये झालेल्या सोहळ्यात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.

सुरवातीला भाजपकडून सातारा विधानसभा मतदार संघातून विजयी झालेले भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी शपथ घेतली. शिवेंद्रराजे भोसले हे 2019 मध्ये सातारा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर ते आता पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून आलेत. त्यांची साताऱ्यात मोठी ताकद आहे. त्यांना यावेळी भाजप पक्षाने मंत्रिपदाची संधी दिली आहे. तसेच जयकुमार गोरे यांना यावेळी भाजपने संधी दिली असून त्यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली. जयकुमार गोरे हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. गोरे हे सातारा जिल्ह्यातील माण विधानसभा मतदारसंघातून चारवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांचं मंत्रीपद कायम ठेवण्यात आलं आहे. देसाई देखील आज मंत्री म्हणून शपथ घेतील. शिंदेंच्या मंत्रिमंडळात ते गृहराज्यमंत्री होते.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून वाई, महाबळेश्र्वर आणि खंडाळा विधानसभा मतदार संघाचे आमदार मकरंद पाटील यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली तेव्हा मकरंद पाटील यांना देखील मंत्रिपद मिळणार होतं. मात्र, त्यावेळी ते शक्य झालं नव्हतं. यावेळी राष्ट्रवादीतून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याने यामध्ये मकरंद पाटील यांना संधी देण्यात आली आहे.