मांढरदेवी काळुबाईची यात्रा ‘या’ दिवशी भरणार

0
6
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाई तालुक्यातील मांढरदेवी येथील श्री काळुबाई देवीची यात्रा जवळ आली आहे. हि यात्रा दि. १२, १३ व १४ जानेवारी रोजी भरणार असून यात्रा उत्सव एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे यात्रा उत्सवाची तयारी सुरू झालेली आहे.

राज्यभरातील भाविकांना नवसाला पावणारी देवी अशी मोठी ख्याती असलेल्या सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील श्री काळुबाई देवीची यात्रा दरवर्षी पौष महिन्यात पौष पौर्णिमेला भरते. यावर्षी दि. १२ जानेवारीला देवीचा जागर चालू होऊन मुख्य दिवस दि. १३ जानेवारी रोजी असणार आहे. देवीच्या यात्रेसाठी कापूरहोळ- भोर- आंबाडे मार्गावरून मोठ्या प्रमाणावर आंबाडखिंड घाटमार्गे भाविकांची गर्दी होत असते. मात्र, यंदा रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता वाहन चालकांकडून वर्तवली जात आहे.

या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या यात्रेला मागील वर्षाच्या तुलनेत भाविकांची गर्दी कमी होण्याचे चित्र आहे.या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या यात्रेला मागील वर्षाच्या तुलनेत भाविकांची गर्दी कमी होण्याचे चित्र आहे. संबंधित विभागाने मांढरदेवी यात्रा काळासाठी सुरू असलेल्या रस्त्याचे काम पूर्ण करून दिले तरच भाविक भक्तांना आंबाडखिंड घाटमार्गे काळूबाई देवीला जाणे सोयस्कर ठरणार आहे.

सध्या भोर -आंबाडे-आंबाडखिंड घाट रस्त्याचे नूतनीकरणाचे काम सुरू ३१ डिसेंबर पर्यंत हे काम सुरू राहणार आहे. एक महिन्यावर येऊ घातलेल्या मांढरदेवी येथील श्री काळुबाई देवीच्या यात्रेसाठी ३१ डिसेंबर पासून वाहतुकीस रस्ता पूर्णपणे खुला करण्यात येणार आहे.