कराड प्रतिनिधी । 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या मुंबईवर अतिरेकी हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आज कराड शहर पोलीस ठाण्यात श्रद्धांजली वाहण्यात आली. लायन्स क्लब कराड सिटीच्या वतीने श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कराड शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजू शिलदार व लायन्स क्लब कराड सिटीचे जेष्ठ सदस्य महेश खुस्पे यांच्यासह उपस्थित लायन्स क्लबचे सदस्य, पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वतीने २६ नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यांमधील सर्व शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
त्यानंतर कराड पोलीस स्टेशनमधील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. कराड शहर पोलीस ठाण्यात पार पडलेल्या कार्यक्रम प्रसंगी कराड शहर पोलीस ठाण्यातील पोलीस इन्स्पेक्टर श्री. रविंद्र काळे, श्री. मारुती चव्हाण, श्री.डिसले, श्री. पवार, लायन्स क्लब कराड सिटीच्या अध्यक्षा मंजुरी खुस्पे, सचिव शशिकांत पाटील, खजिनदार लक्षमण यादव, सुनीता पाटील, प्रवीण भोसले, कांचन सोळवंडे, अनिल पाटील, राजकुमार बाबर, दिग्विजय पाटील, सुनिता कदम, सौ. चोपडे आदी उपस्थित होते.