सातारा प्रतिनिधी | सातारा हे राजधानीचे शहर आहे. त्यामुळे नाक्यावरील शिवतीर्थाचे काम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाला साजेसे व भव्य स्वरूपाचे व्हावे, अशी लोकप्रतिनिधी व तमाम सातारकरांची इच्छा होती. हीच इच्छा ओळखून सातारा पालिकेच्या वतीने पोवई नाक्यावरील शिवतीर्थाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. आता या ठिकाणी शिवछत्रपतींची राजमुद्रा, जिल्ह्यातील गडकिल्ल्यांची चित्रे तसेच तलवार व भालाधारी मावळ्यांचे पुतळे बसवण्यात आले आहेत. या कामातून इतिहास झळकण्याबरोबर राजधानीच्या वैभवातही भर पडली आहे.
मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या मार्गदर्शनानुसार पालिका प्रशासनाने सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण करून या कामाची जबाबदारी ‘सोनाली कन्स्ट्रक्शन’ या संस्थेवर सोपविली. या संस्थेकडून अत्यंत आखीव-रेखीव पद्धतीने शिवतीर्थ व परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले. या कामासाठी २० हजारांहून अधिक घडीव काळ्या दगडांचा वापर करण्यात आला. या दगडांच्या माध्यमातून येथे किल्ल्याप्रमाणे बुरुज, तटबंदी, मेघडंबरीही उभारण्यात आली आहे.
हे काम पूर्णत्वास आल्याने आता शिवतीर्थाच्या अंतर्गत भागात छत्रपतींची राजमुद्रा, किल्ले अजिंक्यतारा, प्रतापगड, चार भिंती स्मारक, सज्जनगड, पुरातन मंदिरे या ऐतिहासिक वास्तूंसह कोयना धरण, सातारकरांची तहान भागविणारे कास धरण येथे चित्ररूपात मांडण्यात आले आहे. याशिवाय भाला व तलवारधारी मावळ्यांचे पुतळेही येथे उभे करण्यात आले आहेत. सुशोभीकरणाच्या या कामातून राजधानीच्या वैभवात भर पडली असून, शिवतीर्थाचे सौंदर्यही खुलून गेले आहे. त्यामुळे साताऱ्याच्या सौंदर्यात भरच पडली आहे.
कोयना धरण
पाटण तालुक्यातील हेळवाक या गावाजवळ कोयनाधरण आहे. डोंगररांगांनी निर्माण झालेल्या खोल दरीत कोयना नदी आडवून हे प्रचंड धरण बांधण्यात आले आहे. या धरणाजवळ वसलेल्या वस्ती वजा गावाला कोयनानगर असे म्हणतात. महाराष्ट्राला वरदान ठरलेले कोयना धरणाच्या हे विशाल शिवसागर जलाशयात १३ मार्च १९९९ ला लेक टॅपिगचा यशस्वी प्रयोग करण्यात आला. या धरणावर चार टप्प्यामध्ये विद्युत निर्मिती करण्यात येते. या कोयना धरणाचे आखावी अशा चित्राचे शिल्प शिवतीर्थ परिसरात भिंतींवर लावण्यात आले आहे.
किल्ले अजिंक्यतारा
अजिंक्यतारा किल्ला हा समुद्रसपाटीपासून सुमारे 3,300 फूट उंचीवर असलेली ही भव्य वास्तू आहे, याला “साताऱ्याचा किल्ला” असेही म्हटले जाते तसेच हा किल्ला संपूर्ण साताऱ्याचे चित्तथरारक दृश्य देतो. या किल्ल्याची काही मुख्य आकर्षणे सुद्धा आहेत. जसे की: हनुमान मंदिर, महादेव मंदिर आणि मंगला देवी मंदिर तसेच भव्य तारा राणीच्या महालाव्यतिरिक्त, अजिंक्यतारा किल्ल्यातील काही मुख्य आकर्षणे या ठिकाणी आहेत. या किल्ल्याचे देखील शिल्प या याठिकाणी लावण्यात आले आहेत.
प्रतापगड
प्रतापगड हा महाराष्ट्र राज्यातील एक प्रसिद्ध किल्ला आहे. हा किल्ला महाबळेश्वरजवळ आहे आणि सातारा जिल्ह्यात येतो. प्रतापगडचा इतिहास शिवाजी महाराजांशी संबंधित आहे. शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला होता आणि त्याच्या सैन्याच्या तळाच्या ठिकाणी होता. प्रतापगडवरून शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या सैन्याशी युद्ध केले होते. प्रतापगडची वास्तुकला अत्यंत अद्वितीय आहे. हा किल्ला एका टेकडीवर बांधला गेला आहे आणि त्याच्याभोवती एक मजबूत भिंत आहे. किल्ल्यात अनेक बुरूज आहेत आणि त्याच्या मध्यभागी एक भव्य सभागृह आहे.प्रतापगड हे एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. येथे दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. किल्ल्याच्या सभोवतालचा निसर्गरम्य परिसर आणि किल्ल्याची ऐतिहासिक महत्त्व हे येथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करते. प्रतापगडच्या आसपास अनेक इतर आकर्षक स्थळे आहेत, जसे की महाबळेश्वर, पाचगंगा, आणि आर्थर सीट. ही स्थळे निसर्गप्रेमी आणि इतिहासप्रेमी या दोन्हींसाठी आकर्षक आहेत. या किल्ल्याचे देखील शिल्प या याठिकाणी लावण्यात आले आहेत.