जमाना डिजिटल, तरीही प्रचारात रिक्षाचा रुबाब कायम; दररोज 1500 रुपये भाडे

0
27
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | निवडणूक प्रचारात कमी वेळेत सर्व मतदारांच्या दारात पोहोचणे शक्यच नसते. अशावेळी अधिकाधिक मतदारांच्या कानावर उमेदवाराचे नाव, त्याचे कार्य आणि चिन्ह याची माहिती पडण्यासाठी रिक्षा फिरवणे आवश्यक ठरते. डिजिटल युगातही रिक्षातून पुकारा करत होणारा प्रचार सर्वच उमेदवारांना हवासा वाटतो.

गेल्या २५ ते ३० वर्षांपूर्वी एखाद्या गोष्टीची जाहिरात करायची असेल किंवा प्रसार करायचा असेल, तर रिक्षावर स्पीकर लावून ती फिरवावी लागत होती. सध्याच्या काळातही रिक्षावर स्पीकर लावून त्याद्वारे प्रचार व प्रसार करण्याचे महत्त्व टिकून आहे. निवडणुकीतही रिक्षातून प्रचाराचे महत्त्व यंदाच्या निवडणुकीतही कायम असल्याचे दिसून येते. सांगलीत प्रमुख तीनही पक्षांच्या उमेदवारांनी रिक्षातून प्रचारावर भर दिल्याचे दिसते. रिक्षाच्यावर स्पीकर, तिन्ही बाजूला डिजिटल फलक, त्यावर उमेदवाराचा फोटो, चिन्ह असा मजकूर प्रसिद्ध केलेला दिसतो.

रिक्षातून नियोजनबद्ध प्रचार करून सर्व प्रभागात उमेदवाराचे नाव, पक्ष, चिन्ह पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते धडपडताना दिसत आहेत. रिक्षा चालकाला सकाळी ८ वाजता बोलवले जाते. बॅटरी, स्पीकर देतीम कोणत्या भागात फिरायचे सांगितले जाते. त्याप्रमाणे प्रचार सुरू होतो. दिलेल्या भागात कोपऱ्यावर, चौकात थांबल्यानंतर स्पीकर सुरू करायचा. उमेदवाराची माहिती, गाणे, कार्य सांगून मतदानाचे आवाहन केले जाते. दुपारी एक ते तीन वेळेत झोपमोड होऊ नये म्हणून तसेच जेवणासाठी सुटी दिली जाते. त्यानंतर तीन ते सायंकाळी आठपर्यंत प्रचार समाप्त होतो. त्यानंतर बॅटरी, स्पीकर प्रचार कार्यालयात जमा करावा लागतो.

दिवसाकाठी भाडे 1500 हजार रुपये

सध्या शेकडो रिक्षा सांगली परिसरात फिरताना दिसतात. प्रचारासाठी रिक्षा फिरविण्यास • चालकास रोज साधारण दीड हजार रुपये दिले जातात. त्यामध्ये पेट्रोलचा खर्च चालकानेच करायचा असतो. दिलेला भाग दिवसभरात पूर्ण करणे भाग असते.

पुरावाही द्यावा लागतो..

रिक्षा दिलेल्या भागात कोठे-कोठे गेली होती, कोठे थांबली होती याचा पुरावा म्हणून रिक्षा चालकांना फोटो काढण्यास सांगितले जाते. ठराविक चालकांना कार्यकर्त्याकडून पुरावा मागितला जातो. सध्याच्या काळात दिवसाकाठी दीड हजार रुपये मिळतात म्हणून अनेकांनी प्रचारात उडी घेतली आहे.