सत्ताधाऱ्यांचा राज्य लुटण्याचा नवा डाव; खेडच्या शिवस्वराज्य यात्रेत जयंत पाटलांची टीका

0
3
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेचे कोरेगावात पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून उत्साहात स्वागत करण्यात आले. या यात्रेनंतर खेड येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. “राज्य वाचवण्यासाठी चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्यांना बाहेर घालवण्याची सुरुवात कोरेगावातून करावी लागेल. सध्या राज्य लुटण्याचा पण सत्ताधाऱ्यांनी केला आहे. मागतील ते द्यायला आणि म्हणेल त्या मार्गाने लोकांना खूष ठेवायला सरकार तयार आहे. हा त्यांचा नवा डाव असल्याचे पाटील यांनी म्हंटले.

खेड येथील शिवस्वराज्य यात्रेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटी यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार शशिकांत शिंदे, प्रभाकर घार्गे, मेहबूब शेख, सुनील माने, राजकुमार, पाटील, घनश्याम शिंदे, दीपक कदम आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, “पक्ष फुटला, तेव्हा आम्ही मोजकेच शिल्लक राहिलो. या राज्यात पळपुट्यांची संख्या फार आहे, निधड्या छातीने लढणाऱ्यांची संख्या कमी आहे. समोर अनेक अडचणी दिसत असूनही कोरेगावचे बहाद्दर नेते शशिकांत शिंदे ठाम राहिल्याचा आम्हाला अभिमान आहे, त्यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले.

दमदार तुतारी फुंकायची आहे : डॉ. अमोल कोल्हे

अमित शहा म्हणतात आणखी फोडा, मग जे फोडले ते कामाचे नाहीत का? असा प्रश्न करून डॉ. कोल्हे म्हणाले, “शशिकांत शिंदे यांच्या पराभवाची सल तुम्हा आम्हा सर्वांनाच आहे. त्याचा वचपा काढण्यासाठी, परतफेड करण्यासाठी कोरेगावचा आमदार महाविकास आघाडीचाच करायचा आहे. त्यासाठी दमदार तुतारी फुंकायची आहे. आपण आवश्यक त्या सर्व गोष्टी विकत घेतो; पण आमदार, मंत्री विकत घेता येतात, हे महाराष्ट्राने पाहिले. लोकप्रतिनिधी व्यावसायिक होतो, तेव्हा मतदारसंघाचा विकास १५-२० टक्क्यांमध्ये अडकतो, हे लक्षात ठेवा.”