‘टेंभू’च्या सहाव्या टप्प्याचे उद्या मुख्यमंत्री शिंदेसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

0
7
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा, सांगली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या टेंभू योजनेच्या ६ व्या टप्याचे भूमिपूजन व शेतकरी मेळाव्याचा पूर्वनियोजित कार्यक्रम उद्या दि. १ रोजी मंगळवारी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. विटा येथील महात्मा गांधी विद्यामंदिरच्या मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती असणार आहे.

टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या कामांचा प्रारंभ उद्या दि. १ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार असून या निमित्ताने विट्यात मोठा शेतकरी मेळावा आयोजित केला आहे. टेंभू योजनेच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी स्व. आमदार बाबर यांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले. टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याचे काम मार्गी लागून वर्कऑर्डर निघाली आहे. १ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होणाऱ्या सहाव्या टप्प्याच्या सुळेवाडी येथील कार्यक्रमास मंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, भाजपचे चंद्रकांत पाटील यांच्यासह महायुतीतील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

टेंभू योजनेच्या या सहाव्या टप्प्यात सहा अ एक, सहा अ दोन आणि सहा ब अशा तीन टप्प्यांचा समावेश आहे. या माध्यमातून खानापूर तालुक्यातील २८, आटपाडी तालुक्यातील १४ आणि तासगाव तालुक्यातील १२ गावांना पाणी मिळणार आहे. जवळपास १८ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. याशिवाय सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील गावांना मिळणारे पाणी मिळणार आहे.

टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्यामधून खानापूर व तासगाव तालुक्यातील गावांना पाणी दिले जाणार आहे. कामथ वितरिकेमधून आटपाडी तालुक्यातील पुर्व भागातील गावांना पाणी दिले जाणार आहे. माण-खटाव वितरिका आटपाडी पश्चिम भागातील गावांना पाणी दिले जाणार आहे.