रक्षाबंधनासाठी भाऊंना राखी मिळावी म्हणून सातारच्या टपाल विभागाने ‘अशी’ केलीय वितरणाची व्यवस्था

0
3
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । राखी पाकिटांचे भारतातील सर्व ठिकाणी लवकर वितरणासाठी सातारा टपाल विभागातर्फे भेट कार्ड स्वीकारण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. या सुविधेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सातारा विभाग डाकघरचे वरिष्ठ अधीक्षक यांनी केले आहे.

सातारा जिल्ह्यातील मोठ्या पोस्ट ऑफिसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाणाऱ्या मेल्ससाठी स्वतंत्र पत्रपेट्या, ट्रे ठेवलेल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील विविध डाकघरांसाठी पुढीलप्रमाणे स्वतंत्र पत्रपेट्या ठेवल्या आहेत. सातारा जिल्ह्यात सातारा प्रधान डाकघर- पिनकोड नं. 415001, सातारा शहर- 415002, एमआयडीसी सातारा- 415004, संगमनगर सातारा- 415003, वाई- 412803, कोरेगांव- 415501, लोणंद- 415521, महाबळेश्वर- 412806, फलटण- 415523, पाचगणी- 412805 याप्रमाणे पिनकोड आहेत.

या पोस्ट ऑफीसमध्ये सातारा शहर आणि जिल्हा, पुणे शहर, पुणे जिल्हा, सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, उर्वरीत महाराष्ट्र, उर्वरीत भारतसाठी स्वंतत्र पेट्या किंवा ट्रे ठेवण्यात आल्या आहेत. या मुख्य पोस्ट कार्यालयाव्यतिरीक्तही इतर पोस्टातही राखी पाकिटे स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी त्यांची राखी पाकिटे पोस्ट कार्यालयात व्यवस्था केलेल्या पत्र पेट्या, ट्रे यामध्ये टाकावी किंवा टपाल कर्मचारी यांचेकडे द्यावीत. याबाबतीत काही अडचण असल्यास जवळच्या पोस्ट ऑफिस मधील कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी, असेही वरिष्ठ अधीक्षक डाकघर यांनी कळविले आहे.