साताऱ्यात ‘या’ दिवशी सज्जनगड रन 2024 चे आयोजन

0
2
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यातील मॅरेथॉनपटू नागरिकांसाठी सज्जनगड येथील श्री. समर्थ सेवा मंडळच्या वतीने दि. ११ ऑगस्टला सज्जनगड रन २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे.

या रनबद्दल माहिती देताना समर्थभक्त डॉ. अच्युत गोडबोले म्हणाले, “श्री समर्थ रामदास स्वामींच्या साहित्याचा प्रचार आणि प्रसार करण्याबरोबरच नागरिकांना आरोग्याचा मंत्र द्यावा, यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गजवडी (ता. सातारा) अभयसिंहराजे हायस्कूलपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेचा समारोप सज्जनगड येथे श्री समर्थ सेवा मंडळाच्या कार्यालयानजीक होईल.

१८ वर्षांवरील पुरूष व महिलांसाठी असलेल्या या पाच किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत संपूर्ण धावणमार्ग हा चढाचा असल्याने धावपटूंचा निश्चित कस लागेल. या स्पर्धेत इच्छुकांसाठी सशुल्क प्रवेश दिला जाणार आहे. इच्छुक धावपटूंनी पंचपाळी हौदानजीकच्या समर्थ सदन येथे संपर्क साधावा, असे आवाहन योगेशबुवा रामदासी यांनी केले आहे.