प्रक्रिया उद्योगांसाठी शासनाकडून 21 कोटी; युवकांना रोजगार निर्मितीची संधी

0
7
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते. केंद्र शासनाच्या आर्थिक मदतीतून प्रत्येक जिल्ह्यात पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (पीएमएफएमई) योजना राबविली जात आहे. जिल्ह्यात या माध्यमातून २१.८४ कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.

सातारा येथे मार्च महिन्यात जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद पार पडली. यावेळी जिल्ह्यातील छोट्या उद्योजकांपासून मोठया उद्योजकांनीही गुंतवणुक करण्याकरिता पुढाकार घेतला. यावेळी एकूण 56 उघोजकांकडून 1 हजार 150 कोटी रुपये गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. या गुंतवणुकीतून सातारा जिल्ह्यात भविष्यात 2 हजार 800 नवीन रोजगार निर्मिती होणार आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात प्रक्रिया उद्योगांसाठी शासनाच्या वतीने २१ कोटी देखील देण्यात आले आहेत.

सातारा जिल्ह्यात एकीकडे शासनाकडून प्रक्रिया उद्योगांसाठी पैसे दिले जात आहेत. तर दुसरीकडे जिल्ह्यातील छोट्या उद्योजकांपासून मोठया उद्योजकांनीही गुंतवणुक परिषदेच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील युवकांना रोजगार निर्मितीसाठी मदत होणार आहे. सातारा जिल्ह्याने पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेंतर्गत २०२३-२४ या वर्षात २१ कोटी ८४ लाख रुपयांचे प्रस्ताव मंजूर केले आहेत.

योजनेतून कोणाला लाभ मिळतो ?

वैयक्तिक लाभार्थी : प्रगतिशील शेतकरी.नवउद्योजक, बेरोजगार युवक, वैयक्तिक मालकी भागीदारी, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहायता गट, एनजीओ, सहकारी संस्था, खासगी कंपनी यांना लाभ मिळतो. तसेच शेतकरी उत्पादक

अर्ज करण्याची पद्धत

योजनेतून https://pmfme.mofpi.gov.in वा URL या वर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. Online मोबाइलवर देखील अर्ज सादर करता येईल. त्यासाठी निवडलेल्या जिल्हा संसाधन व्यक्ती यांची मदत घेता येईल.

काय आहे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना?

ग्रामीण व शहरी भागातील स्वयंसहायता गटातील महिलांना सूक्ष्म अन्न प्रक्रियेतून सन्मान व प्रतिष्ठा मिळू शकते. स्वयंसहायता गटांचे अन्न प्रक्रिया उद्योग असंघटित असल्याने बऱ्याच उत्पादनांची सर्वोत्तम गुणवत्ता असूनही आकर्षक पॅकिंग व ब्रेंडिंग न झाल्यामु‌ळे बाजारामध्ये टिकाव धरू शकत नाहीत. ही समस्या दूर करण्यासाठी आणि स्थानिक, सेंदिय व पारंपरिक उत्पादनांना व स्थानिक स्तरावर रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ही योजना २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षांसाठी लागू केली आहे. योजनेतून सध्या कार्यरत असलेल्या व क्या नवीन सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना बँक कर्जाशी निगडित लाभ दिला जातो.

प्रशिक्षण किती दिवस असते ?

योजनेतर्गत जिल्हास्तरीय समितीने कर्ज मजुरीसाठी बँकेकडे शिफारस केलेले वैयक्तिक लाभार्थी ३ दिवस प्रशिक्षण तर योजनेतून बीज भांडवल लाभ मिळालेले स्वयसहायता गटाचे लाभार्थी १ दिवस प्रशिक्षण घेतात.