जिल्हा प्रशासन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

0
3
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । जिल्हा प्रशासन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने शाहू जिल्हा क्रीडा संकुल येथे शुक्रवारी आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सातारा शहरातील शाळेतील विद्यार्थी, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू, स्काऊट व गाईड योग साधकांनी नयोगासनाचे धडे गिरवले.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, सिव्हिल सर्जन डॉ. युवराज करपे, समाज कल्याण अधिकारी नितीन उबाळे,जिल्हा आयुष अधिकारी डॉ मिथुन पवार, सहाय्यक जिल्हा आयुष अधिकारी, डॉ. संजीवनी शिंदे सातारा तालुका गटविकास अधिकारी सतीश बुद्धे महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे राज्यसचिव प्रल्हाद पारटे इंटरनॅशनल नेचरोपॅथी ऑर्गनायझेशनच्या डॉ. पल्लवी दळवी, मैत्रेय योगच्या संस्थापिका अपर्णा शिंगटे, नितेश भोसले आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर म्हणाले की, आंतरराष्ट्रीय योग दिन, २०२४ ची थीम स्वतः साठी वं समाजासाठी योग असून शारिरीक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी तसेच भारताचे संस्कृती व परंपरा यांचा सारासार विचार योग शास्‍त्रात केला आहे. शारिरीक, मानसिक, बौधिक, अध्यात्मिक, सामाजिक विकासासाठी योग सहाय्यभूत असून, आयुष मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या शिष्टाचारानुसार दरवर्षी दिनांक २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

news 1

योग प्रोटोकॉलचे संपूर्ण मार्गदर्शन ‘मैत्रिय योग’च्या संस्थापक, योगशिक्षीका अपर्णा शिंगटे यांनी केले.अनुराधा इंगळे यांनी प्राणायाम केले तर हेमांगी पिसाळ, धारा गोहेल, मालती राऊत, शुभांगी पाटील, सुवर्ण वाघमारे यांनी प्रात्यक्षिक करून दाखविली. यावेळी व्यसन मुक्तीची शपथ सर्वांनी घेतली. योगशिक्षक,योग निसर्गोपचार तज्ञ पूरब आनंदे, अपर्णा शिंगटे , धारा गोयल, प्रल्हाद पारटे यांनी प्रात्यक्षिके घेतली. विता कारजकर यांनी सूत्रसंचालन आणि योगाचे मार्गदर्शन केले.

सातारा 03

‘या’ प्रकारची करण्यात आली योगासने व आसने

यामध्ये योगासन पूर्व हालचाली त्यानंतर उभी आसने यामध्ये ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, त्रिकोनासान. बैठी आसने यामध्ये वज्रासन,उष्ट्रसान, शशंकासन, मंडूकासन, पोटावरील आसने यामध्ये मकरासन, भुजंगासन, शलभासन ,पाठीवरील आसने यामध्ये नौकासन, पवनमुक्तासन, उत्तनपदासन, अर्धहलासन, शवासन आदी आसने करीत कपळभाती शुद्धीक्रिया आणि अनुलोम विलोम काकी, भ्रामरी प्राणायाम ध्यान घेण्यात आले.

‘यांनी’ घेतला योग्य दिनानिमित्त कार्यक्रमात सहभाग

नेहरु युवा केंद्र सातारा समन्व्यक श्री देशमुख, सुमित पाटील, सुनील कोळी इंटरनॅशनल नेचरोपॅथी ऑर्गनायझेशन,गाथा योग साधना केंद्र, आर्ट ऑफ लिव्हींग , गुरुकृपा राजयोग चॅरिटेबल ट्रस्ट, विवेकानंद केंद्र कन्याकुमारी नगर स्थान सातारा, पतंजली योग समिती, हॅप्पी लाईफ फौंडेशन सातारा, महाराष्ट्र योग शिक्षक संघ, सातारा जिल्हा मुदिता योग, , योगग्राम सांबरवाडी, योग विद्याधाम, सातारा विविध योग संस्था माध्यमातून घेण्यात आला.