अबब!!! जिल्ह्यातील 9820 रेशनकार्ड धारकांनी बदलले आपले दुकानदार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । आपण रेशकार्डधारक असाल तर आपल्यासाठी ही महत्वाची बातमी. आपल्याला आपला स्वस्तधान्य दुकानदार बदलून दुसऱ्या ठिकाणी राहत असलेल्या दुकानदाराकडे रेशकार्ड बदलायचे असेल तर पोर्टेबिलिटीद्वारे आपल्याला ते कारण शक्य आहे. आपल्याला मोबाइल नंबर प्रमाणेच आता रेशनकार्डदेखील पोर्ट करता येतं येणार आहे. मोबाइल पोर्टेबिलिटीमध्ये जसा नंबर बदलत नाही तसाच वापरता येतो, त्याचप्रमाणे रेशन कार्ड पोर्टेबिलिटीमध्येही रेशन कार्ड बदलळे जाणार नाही. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात लाभार्थी गेला तरी आपल्या रेशन कार्डचा वापर करून दुसऱ्या राज्यातून सरकारी रेशन खरेदी करू शकतो. जिल्ह्यात अशाप्रकारे ९ हजार ८२० जणांनी या सुविधेचा लाभ घेतला असून त्यांनी आपले दुकानदार बदलले आहे.

रेशन कार्डच्या पोर्टेबिलिटीसाठी काही महत्वाच्या गोष्टी करणे आवश्यक आहे. स्वस्त धान्य दुकानांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स पॉइंट ऑफ सेल डिव्हाइसेससह व्हेरीफिकेशन केले जाते. लाभार्थीची ओळख ही त्यांच्या आधार कार्डवरून इलेक्ट्रॉनिक पॉइट ऑफ सेल डिव्हाइसद्वारे पाठवली जाईल. यासाठी व्हेरीफिकेशनच्या वेळी रेशन कार्ड आणि आधार कार्ड सोबत असणे आवश्यक आहे.

व्हेरीफिकेशन आधार क्रमांकावरूनच केले जाते. तसे केल्याने राज्यात वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या रेशनकार्ड धारकांनाही रेशन मिळू शकते.सातारा जिल्ह्यात आतापर्यंत ९ हजार ८२० जणांनी दुकानदार बदलला असून यामध्ये जिल्ह्यातील ९ हजार ८१२ तर राज्यात परप्रांतात ८ असे एकूण ९ हजार ८२० जणांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.

9820 जणांनी आपले रेशनकार्ड दुकानदार बदलले

जावळी : ५९६, कराड : २७७१, खंडाळा : ४८८, खटाव : ५४७, कोरेगाव : ८८३, महाबळेश्वर : ४८२, माण : ४९८, पाटण : १२६, फलटण : १४३, सातारा : १८१२, वाई : १३२, परराज्यात : १२ असे एकूण ९ हजार ८२० जणांनी आपले रेशनकार्ड दुकानदार बदलले आहेत.

जिल्ह्यात ३ लाख ८८ हजार ९०७ रेशनकार्डधारक

सातारा जिल्ह्यात ३ लाख ८८ हजार कुटुंबांना शासनाकडून रेशन मिळते. यामध्ये अंत्योदयचे २७ हजार ००७ आणि प्राधान्य गटाचे ३ लाख ६२ हजार ०४२ असे ३ लाख ८८ हजार ९०७ लाभार्थी आहेत. जिल्ह्यातील १ हजार ७१३ रेशन दुकानदारांमार्फत त्यांना धान्य वितरित करण्यात येते.

कोणते किती कार्डधारक?

जिल्ह्यात रेशकार्डद्वारे लाभ घेणाऱ्या रेशनकार्डधारकांचे दोन मुख्य प्रकार आहेत. एक अंत्योदय योजनेतील रेशनकार्डधारक. त्यांची संख्या हि २७ हजार ७ इतकी आहे. तर केशरी रेशकारधारकांची संख्या ३ लाख ६२ हजार ०४२ इतकी आहे.