झेडपीतील सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर, CCTV बिघाडाचा चोरटे घेतायत फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । राज्याचे मिनी मंत्रालय अशी ओळख जिल्हा परिषदेची आहे. दररोज हजारो नागारिक या ठिकाणी काम निमित्त ये- जा करत असतात. यातील सातारा जिल्हा परिषदेत सध्या चोरीचे प्रकार घडत आहेत. कारण येथील सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य आवारातील काही सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला असून दुचाकी चोरीसह चंदन चोरीचेही धाडस चोरट्यांकडून केले जात आहे.

सातारा जिल्हा परिषदेच्या सुरक्षिततेबाबत कोणालाच गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. शासनाच्या विविध योजनांची जिल्हास्तरावर अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात येते. जिल्हा परिषदेत ग्रामीण भागातून हजारो नागरिक रोज येतात. या नागरिकांच्या व इतर कामकाजाच्या सुरक्षेची जबाबदारी झेडपीची आहे. मात्र, मुख्य आवारासह अन्य ठिकाणी सुरक्षेसाठी लावण्यात आलेले काही सीसीटीव्ही कॅमेरे काही दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे सुरक्षा रामभरोसे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

झेडपीच्या प्रवेशद्वाजवळ अधिकाऱ्यांची वाहने असून शेजारीच दुचाकी पार्किंग आहे. समोरील बाजूस उद्यान असून दोन्ही बाजूला गेट आहे. याच ठिकाणासह इतर ठिकाणचे काही कॅमेरे बंद आहेत. झेडपीच्या मुख्य आवारात दोन महिन्यांपूर्वी कंत्राटदारांच्या मारहाणीची घटना घडली होती. मारहाणीच्या ठिकाणी असलेला सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्याचे त्याचे फुटेज दिसले नाही. त्यामुळे झेडपीच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. आता तर चोरट्यांनी या संधीचा फायदा घेत दुचाकी चोरी व चंदन चोरीचे धाडस केले आहे.

एकूण 32 कॅमेऱ्याद्वारे ठेवले जाते लक्ष; मात्र,

सातारा जिल्हा परिषदेच्या दोन्ही इमारतीत एकूण 31 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामधील मुख्य आवारातील नऊ कॅमेरे बंद आहेत. कॅमेरे बसविल्यानंतर काही वर्षानंतर त्याची देखभाल दुरुस्ती होणे गरजेचे असते. मात्र, दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने काही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. सीसीटीव्ही बंद असल्याचा फटका अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबर नागरिकांनाही बसताना दिसत आहे.