सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील आठ मतदार संघातील 198 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रे छाननीमध्ये वैध ठरले होते. आज सर्व मतदार संघातील एकूण 89 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. यामध्ये 255 फलटण 12 उमेदवार, 256 वाई 13, 257 कोरेगाव 10, 258 माण 12, 259 कराड उत्तर 12, 260 कराड दक्षिण 12, 261 पाटण 7 व 262 सातारा 11 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतली आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
यामध्ये 255 फलटण विधानसभा मतदार संघामध्ये अमोल कुशाबा अवघडे अपक्ष, अॅड. आकाश शिवाजी आढाव अपक्ष, गंगाराम अरुण रणदिवे अपक्ष, जयश्री दिगंबर आगवणे अपक्ष, नंदू संभाजी मोरे अपक्ष, प्रशांत वसंतराव कोरेगावकर अपक्ष, बुवासाहेब हुंबरे अपक्ष, भिसे विमल विलास (तुपे) अपक्ष, राजेंद्र भाऊ पाटोळे अपक्ष, रवींद्र रामचंद्र लांडगे अपक्ष, हरीभाऊ रामचंद्र मोरे अपक्ष, हिंदूराव नाना गायकवाड अपक्ष.
256 वाई विधानसभा मतदार संघामध्ये अविनाश मारुती फरांदे अपक्ष, अशोकराव वामन गायकवाड अपक्ष, ईशान गजानन भोसले अपक्ष, कल्याण दादासो पिसाळ-देशमुख अपक्ष, दत्तात्रय दादासाहेब पाटील अपक्ष, दिलीप दगडू पवार अपक्ष, नंदकुमार मुगूटराव घाडगे अपक्ष, निलेश भगवान धनावडे अपक्ष, प्रताप बाजीराव भिलारे अपक्ष, प्रदीप रामदास माने अपक्ष, रवींद्र मानसिंग भिलारे अपक्ष, सर्जेराव गेणू मोरे अपक्ष, सुरेशराव दिनकर कोरडे अपक्ष.
257 कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये अजित प्रदीप पवार सनय छत्रपती शासन, नितीन भरत बोतालजी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (ए), ऋषीराज जगन्नाथ कणसे अपक्ष, प्रिया महेश शिंदे अपक्ष, वैशाली शशिकांत शिंदे अपक्ष, शशिकांत धर्माजी शिंदे अपक्ष, सुधाकर बाबूराव फाळके अपक्ष, संजय बाबासाहेब भगत अपक्ष, संजय शिवराम भोसले अपक्ष, अॅड. संतोष गणपत कमाने-अपक्ष.
258 माण विधानसभा मतदार संघामध्ये अनिल रघूनाथ पवार स्वाभिमानी पक्ष, अरविंद महेश मारुती कचरे अपक्ष, ज्योत्स्ना अनिल सरतापे अपक्ष, विकास सदाशिव देशमूख अपक्ष, नागेश विठ्ठल नरळे अपक्ष, नंदकुमार उर्फ नानासाहेब महादेव मोरे अपक्ष, राजेंद्र बाळू बोडरे अपक्ष, शिवाजी शामराव मोरे अपक्ष, सत्यवान गणपत कमाने अपक्ष, सारिका अरविंद पिसे अपक्ष, संदीप नारायण मांडवे (साळुंखे) अपक्ष, हर्षद एकनाथ काटकर अपक्ष.
259 कराड उत्तर विधानसभा मतदार संघामध्ये अधिकराव दिनकर पवार अपक्ष, इब्राहिम मेहमुद पटेल अपक्ष, गणेश वसंत घोरपडे अपक्ष, दत्तात्रय भिमराव भोसले पाटील अपक्ष, प्रशांत रघूनाथ कदम अपक्ष, महादेव दिनकर साळुंखे अपक्ष, रवींद्र दत्तात्रय निकम अपक्ष, रवींद्र भिकोबा सुर्यवंशी अपक्ष, राजेंद्र बापूराव निकम अपक्ष, शिवाजी अधिकराव चव्हाण अपक्ष, सत्यवान गणपत कमाने अपक्ष, संतोष पांडूरंग वेताळ अपक्ष.
260 कराड दक्षिण विधानसभा मतदार संघामध्ये मुंकूद निवृत्ती माने रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (ए), प्रशांत रघूनाथ कदम अपक्ष, गणेश शिवाजी कापसे अपक्ष, गोरख गणपती शिंदे अपक्ष, चंद्रकांत भिमराव पवार अपक्ष, जनार्दन जयवंत देसाई अपक्ष, प्रकाश यशवंत पाटील अपक्ष, रवींद्र वसंतराव यादव अपक्ष, विजय नथूराम सोनावले अपक्ष, शैलेंद्र नामदेव शेवाळे अपक्ष, सुरेश जयवंतराव भोसले अपक्ष, ऋषिकेश विजय जाधव अपक्ष.
261 पाटण विधानसभा मतदार संघामध्ये सचिन नानासो कांबळे रिपब्लीकन सेना, चंद्रशेखर शामु कांबळे अपक्ष, दिपक बंडू महाडिक अपक्ष, प्रकाश तानाजी धस अपक्ष, यशस्विनी सत्यजितसिंह पाटणकर अपक्ष, सयाजीराव दामोदर खामकर अपक्ष, सर्जेराव शंकर कांबळे अपक्ष.
262 सातारा विधानसभा मतदार संघामध्ये सोमनाथ हणमंत धोत्रे रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (ए), अविनाश अरविंद कुलकर्णी अपक्ष, दादासाहेब वसंत ओव्हाळ अपक्ष, प्रशांत मारुती तरडे अपक्ष, विवेकानंद यशवंतराव बाबर अपक्ष, सागर शरद भिसे अपक्ष, वसंत रामचंद्र मानकुमरे अपक्ष, राजेंद्र निवृत्ती कांबळे अपक्ष, सखाराम सावळा पार्टे अपक्ष, हणमंत देवीदास तुपे अपक्ष.
या उमेदवारांनी त्यांचा उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेतला आहे. सातारा जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदार संघात 198 उमेदवारांपैकी 89 उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर 109 उमेदवार सध्या निवडणूकीच्या रिंगणात आहे.