जिल्ह्यात 8 हजार 442 भावी शिक्षक उद्या देणार TET चा पेपर; फिंगरप्रिंट, चेहराही स्कॅन होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा उद्या रविवार, दि. १० नोव्हेंबर रोजी होणार आहे. विधानसभा निवडणुकीमुळे परीक्षा होईल का नाही, अशी भावी शिक्षकांमध्ये धाकधूक होती. मात्र, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे परीक्षेची तारीख जाहीर झाली यासाठी जिल्ह्यात परीक्षा केंद्र निश्चित करून तेथे बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या या परीक्षा दोन सत्रांमध्ये होणार आहेत. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी पेपर क्रमांक एक, तर सहावी ते आठवीसाठी पेपर क्रमांक दोन घेण्यात येतो. जिल्ह्यातून शिक्षकांनी अर्ज केला आहे. पेपर क्रमांकानुसार बैठक व्यवस्था करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यादृष्टीने नियोजन केले जात असून प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. भावी शिक्षकांना प्रवेशपत्रही पाठवून देण्यात आले आहेत. तेही परीक्षान्त्ची तयारी करत आहेत.

ही कागदपत्रे आवश्यक

  • परीक्षार्थीना परीक्षा केंद्रावर घेताना प्रवेश पत्रासोबत आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड सोबत आणणे सक्तीचे करण्यात आले आहे.
  • प्रत्येक परीक्षार्थीचे फेस स्कॅनिंग करून बोटांचे ठसे घेण्यात येणार आहेत.

१३ परीक्षा केंद्रांवर होणार फेस स्कॅनिंग

परीक्षा कॉपीमुक्त व पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी प्रत्येक परीक्षार्थीचे फेस स्कॅनिंग करून बोटाचे ठसे घेण्यात येणार आहेत. साताऱ्यात छत्रपती शिवाजी कॉलेज, लाल बहादूर शास्त्री कॉलेज, महाराजा सयाजीराव विद्यालय, श्रीपतराव पाटील हायस्कूल, आण्णासाहेब कल्याणी विद्यालय, यशवंतराव चव्हाण कॉलेज सातारा, अनंत इंग्लिश स्कूल सातारा, कन्या शाळा सातारा, छत्रपती शाहू अकॅडमी सातारा, सुशीलादेवी कन्या प्रशाला सातारा, आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सातारा, भवानी विद्यामंदिर सातारा, न्यू इंग्लिश स्कूल सातारा या केंद्रांवर होणार आहे.

शिक्षक पात्रता परिक्षा केंद्राच्या 13 ठिकाणी जमावबंदी आदेश जारी

शिक्षक पात्रता परिक्षा सातारा शहरातील विद्यालय व महाविद्यालयांमध्ये 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते 1 व दुपारी 2.30 ते 5 या वेळेत होणार आहे. या अनुषंगाने परिक्षा केंद्राच्या ठिकाणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे परिक्षा केंद्राच्या ठिकाणी जमावबंदी आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी नागेश पाटील यांनी लागू केले आहे. दि. 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 07.00 ते सांयकाळी 06.00 वाजेपर्यंत सातारा जिल्ह्यातील उपरोक्त नमुद केलेल्या परीक्षा केंद्राचे परिसरात व त्या सभोवतालचे 100 मिटर परिसरात परिक्षार्थी, परिक्षेसाठी नेमलेले अधिकारी/कर्मचारी, सुरक्षा अधिकारी/कर्मचारी यांना वगळून इतर व्यक्तींना प्रवेश करण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात आले आहे. तसेच दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.