जिल्ह्यात तब्बल 8 लाख नागरिकांनी घेतलं आयुष्मान कार्ड; 5 लाखांवर मिळतायत मोफत उपचार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांसाठी आयुष्मान भारत योजना राबवित आहे. ही योजना प्रधानमंत्री जनआरोग्य योजना या नावानेही ओळखली जाते. ही योजना आरोग्य विमा योजनाच आहे. लाभार्थ्यांना सरकारी किंवा सूचीबद्ध केलेल्या खासगी रुग्णालयांमध्ये ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा पुरवली जाते. मात्र, त्यासाठी संबंधिताकडे आयुष्मान कार्ड असणे अत्यावश्यक आहे. जिल्ह्यात तब्बल ८ लाख २ हजार ८५९ नागरिकांना आयुष्मान कार्ड देण्यात आले आहेत.

आयुष्मान भारत योजना अशा लोकांना आरोग्य सुरक्षा कवच प्रदान करते, ज्यांचे उत्पन्न अतिशय कमी आहे. अर्थात, योजनेचा लाभ गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या नागरिकांना दिला जातो. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सरकारने काही निकष जारी केले आहेत.

या आजारांवर उपचार?

आयुष्मान भारत योजनेंतर्गत जारी करण्यात आलेल्या आयुष्मान गोल्डन कार्डच्या माध्यमातून जुन्या आणि नव्या अशा सर्व आजारांवर तुम्ही मोफत उपचार मिळवू शकता, उपचार सुविधामध्ये कॅन्सरसारख्या गंभीर आजारांव्यतिरिक्त दीड हजाराहून अधिक आजारांचाही समावेश करण्यात आला आहे.

आयुष्मान योजनेचे फायदे

  • हॉस्पिटलमध्ये दाखल होताना तुम्हाला आयुष्मान कार्ड दाखवणे गरजेचे आहे. त्यानंतर उपचारांच्या खर्चासाठी तुम्हाला कागदपत्र किवा शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. त्यानुसार योजनेंतर्गत कागदपत्र, तसेच रोखरहितऔषधोपचार केले जाऊ शकतात. सरकारी तसेच सूचीबद्ध खासगी हॉस्पिटलमध्ये तुम्ही उपचार घेऊ शकता. वैद्यकीय खर्च व्यतिरिक्त वाहतुकीसाठी होणाऱ्या खर्चाचा ही या योजनेमध्ये समावेश आहे.

कागदपत्रे काय लागतात?

आयुष्मान भारत कार्ड काढण्यासाठी आपल्याला आयुष्यमान भारतपत्र, रेशन कार्ड, आधार कार्ड आदी कागदपत्र लागतात. आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी स्वतः ती व्यक्त्ती हजर असणे आवश्यक आहे

कोठे काढणार कार्ड?

आपले नाव यादीत असल्यास राशन कार्ड, आधार कार्ड व आधार संलग्नित मोबाईल क्रमांकासह आपण आरोग्य केंद्रातील आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत मधील आपले सरकार केंद्र चालक, आपल्या जवळील महा ई-सेवा केंद्र, स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे जावून आपले आयुष्मान कार्ड ई-केवायसी मोफत करून घेऊ शकता.