दुप्पट परताव्याचा बहाणा करत सात जणांनी घातला 80 लाखांना गंडा; आगाशिवनगरातील संशयितावर गुन्हा दाखल

0
1
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | झटपट श्रीमंत होण्याचा नादात अनेकांना फसवणुकीच्या प्रकाराला सामोरे जावे लागत आहे. असाच प्रकार मलकापूर – आगाशिवनगरमध्ये घडला आहे. दुप्पट परतावा देण्याच्या बहाण्याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवत तब्बल ८० लाख ५० हजारांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.

सात जणांच्या फसवणूकप्रकरणी अल्लाउद्दीन गुलाब तांबोळी (रा. गांधीनगर- काले, ता. कराड) यांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दिली असून प्रमोद रमेश पाटील (रा. पंचरत्न अपार्टमेंट, आंगाशिवनगर-मलकापूर, कराड) याच्यावर गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काले येथील अल्लाउद्दीन तांबोळी आणि त्यांचे मित्र श्यामसुंदर सारडा या दोघांची प्रमोद पाटील याच्याशी ओळख होती. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून दिवसाला लाखो रुपये कमवत असल्याचे प्रमोद पाटील याने या दोघांना सांगितले. तसेच त्यांनाही गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले.

त्या गुंतवणुकीची विश्वासार्हता म्हणून त्याच रकमेचे धनादेश आणि नोटरी करून देण्याचेही प्रमोद पाटीलने कबूल केले. त्यानुसार अल्लाउद्दीन तांबोळी यांनी मार्च २०२२ मध्ये साडेदहा लाख आणि श्यामसुंदर सारडा यांनी २१ लाख रुपये प्रमोद पाटील याला दिले होते. मात्र, २०२२ पासून २०२४ पर्यंत प्रमोद पाटील याने दोघांनाही मूळ रक्कम अथवा त्याचा परतावा दिला नाही. त्यामुळे अल्लाउद्दीन तांबोळी आणि श्यामसुंदर सारडा यांनी त्याच्याकडे पैशांची मागणी केली.

मात्र, शेअर मार्केट पडले आहे. थोड्या दिवसांनी पैसे देतो, असे सांगून त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. अल्लाउद्दीन तांबोळी, श्यामसुंदर सारडा यांच्यासह अन्य पाच जणांकडून प्रमोद पाटील याने दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून पैसे घेतल्याचे तसेच सर्वांची मिळून सुमारे ७० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे. अल्लाउद्दीन तांबोळी यांनी याबाबत कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक मारुती चव्हाण तपास करीत आहेत.