सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीसाठी काल मंगळवारपासून नामनिर्देशनपत्र भरण्याच्या पहिल्या दिवशी ६ नामनिर्देश अर्ज दाखल करण्यात आले. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी ७अर्ज दाखल झाले. यामध्ये फलटण मतदारसंघासाठी १, कोरेगावसाठी २ उमेदवारांचे ३, माणमधून १, कराड उत्तरमधून २ अशी एकूण ७ नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत.
विधानसभा निवडणूक प्रक्रियेत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास काल दि. 22 ऑक्टोबर रोजीपासून सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी 30 नामनिर्देशन पत्र वाटप झालेले असून, आज दुसऱ्या दिवशी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात 15 जणांनी एकूण 22 नामनिर्देशनपत्राची खरेदी केली. दरम्यान, आज अखेर एकूण 52 नामनिर्देशन पत्राचे वाटप झाले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास कालपासून सुरुवात झाली आहे. आज दि. 23 ऑक्टोबर अखेर खुल्या प्रवर्गातील 30, अनुसूचित जातीतील 17, अनुसूचित जमाती ०, अपक्ष उमेदवार 23, पक्षीय उमेदवार 17 आदीकडून अर्ज खरेदी करण्यात आले.
यामध्ये नॅशनॅलिस्ट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून 1 अर्ज, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पार्टीकडून 4 अर्ज, बहुजन समाज पार्टीकडून 4 अर्ज, बहुजन समाज पार्टी (मायावती) कडून 1 अर्ज, शिवराज युवक संघटना (महाराष्ट्र) कडून 1 अर्ज., महाराष्ट्र नवनिर्माण सेने पार्टीकडून 1 अर्ज,, वंचित बहुजन आघाडी पार्टीकडून 1 अर्ज, राष्ट्रीय समाज पक्षा कडून 1, भारतीय जनता पार्टी कडून 2 अर्ज, स्वाभिमानी पक्ष शेतकरी संघटणा यांचेकडून 1 अर्ज, अपक्ष-23 अर्ज असे अर्ज खरेदी केले आहेत.