कराड प्रतिनिधी । पावसाळा जवळ आला की, जीर्ण झालेल्या व तडे गेलेल्या इमारती कोसळून मोठ्या प्रमाणात जिवीत हानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा धोकादायक इमारती वेळीच उतरवून घेणे महत्वाचे असते. कराडकरांना पालिकेने अशा धोकादायक इमारतींपासून सावध रहा, अशा सुचना करीत धोकादायक इमारत मालकांना नोटीसा पाठविल्या आहेत. पालिकेच्या अपथकानेर शहरात नुकताच धोकादायक इमारतींचा सर्वे केला असून या सर्व्हेत शहरात तब्बल ६९ इमारती धोकादायक स्थितीत आढळून आल्या आहेत. यामध्ये यावर्षी नव्याने १८ धोकादायक इमारती आढळल्या आहेत. या इमारत मालकांना पालिकेने नोटीस पाठवल्या आहेत.
कराड शहरात येणाऱ्या पावसाळ्यातील साथरोगांचं संकट सध्या पुढे दिसत आहे. त्यामुळे पालिकेकडून पावसाळापूर्व कामे केली जात आहेत. पालिकेने नुकतेच शहरातील धोकादायक व जीर्ण असलेल्या इमारतींची माहिती घेतली असून त्याअनुषंगाने शहरातील धोकादायक इमारत मालकांना पालिकेने नोटीसा दिल्या आहेत.
चाळीस वर्षांपूर्वी दगड, माती आणि लाकडापासून बांधण्यात आलेल्या इमारतींची अवस्था आता अगदी गंभीर बनली आहे. काही इमारतींचे दरवाजे, भिंती खिळखिळ्या झाल्या आहेत. शहरातील दाट लोकवस्तीच्या ठिकाणी अशा धोकादायक इमारती पावसाळ्यात ढासळून जिवीतहानी व वित्तहानी होण्याची जास्त शक्यता असते.
मागीलवर्षी आढळल्या होत्या 57 धोकादायक इमारती
दरवर्षी शहरातील धोकादायक इमारतींचा सर्व्हे पालिकेकडून केला जातो. त्यानुसार मागील वर्षी पालिकेने जेव्हा सर्व्हे केला तेव्हा ५७ धोकादायक इमारती आढळून आल्या होत्या. त्यावेळी पालिकेने नोटीस दिल्यानंतर त्यातील ६ इमारतधारकांनी स्वतःहून इमारती उतरवून घेतल्या. यावर्षी पालिकेकडून धोकादायक इमारतींची माहिती घेतली असता शहरात ६९ इमारती धोकादायक स्थितीत आढळून आल्या आहेत.
धोकादायक इमारती म्हणजे…
पालिकेकडून ठरविण्यात आलेल्या धोकादायक इमारतींमध्ये ४० ते ५० वषार्पूर्वी बांधकाम केलेल्या व जीर्ण झालेल्या इमारत, तिच्या भिंतींला तडे गेले असल्यास, इमारतींच्या लाकडांना वाळवी लागली असल्यास, पांढऱ्या मातीपासून व बारीक दगडापासून बांधण्यात आलेली कौलारू घरे, वाडे यांचा समावेश धोकादायक इमारतींमध्ये होतो.
कराडात यावर्षी नवीन 18 इमारती धोकादायक आढळल्या : स्वानंद शिरगुप्पे
कराड पालिकेकडून शहरातील धोकादायक इमारतींचा सर्वे करण्यात आला आहे. यावर्षी आम्हाला सर्व्हेत एकूण ६९ डोकादायक इमारती आढळून आल्या आहरेत. यामध्ये यावर्षी नव्याने १८ इमारती आढळून आल्या आहेत. संबंधित इमारत धारकांना इमारती उतरवून घेण्याबाबत निवतीस देखील दिलेल्या असल्यची माहिती कराड पालिकेतील अधिकारी स्वानंद शिरगुप्पे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली.