सातारा प्रतिनिधी । ऑगस्ट २०२३ पासून फसवणुक करुन परस्पर विकलेले सुमारे ९० लाख रुपये किमतीचे एकूण ६ ट्रक व डंम्पर राज्याच्या विविध भागातून तसेच हैद्राबाद, गुजरात येथून पोलिसांनी हस्तगत केले. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील वाई पोलिसांच्या वतीने ही कामगिरी करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रोहित रमेश शिंदे यांचे मालकीचा आयशर प्रो कंपनीचा १११० मॉडेलचा ट्रक क्र. (MH11 CH 5160) हा असून सदर गुन्हयाचे अनुशंगाने सखोल तपास करत असताना सदरचा ट्रक हा नाशिक परिसरात एक अनोळखी इसमाकडे असल्याबाबत खात्रीलायक माहिती वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी वाई पोलीस ठाण्यामधील तपासपथकाचे अधिकारी अंमलदार यांस फसवणुक करुन परस्पर विकलेला ट्रक जप्त करण्यासाठी नाशिक येथे जाऊन तपास करुन सदरचा ट्रक हा हस्तगत करण्याचे आदेश दिले.
त्यानंतर तपास पथकाने सदर गुन्हयाचे तपासात तांत्रीक विश्लेषण केल्यानंतर सदरचा ट्रक हा नाशिक शहरात असल्याचे निष्पन्न झाल्याने वाई पोलीस ठाण्याचे तपासपथक तपासकामी जिल्हा नाशिक येथे रवाना होऊन वीस लाख रुपये किमतीचा आयशर ट्रक क्र (MH11 CH 5160) हा दि. १४/०६/२०२४ रोजी जिल्हा नाशिक येथील म्हसरुळ पोलिस ठाणेचे हद्दीमधुन ईमाम खान या व्यक्ती कडुन सापळा रचुन ताब्यात घेतला. ऑगस्ट २०२३ पासुन फसवणुक करुन परस्पर विकलेले सुमारे ९० लाख रुपये किमतीचे ट्रक व डंम्पर महाराष्ट्रातील निरनिराळ्या भागातुन तसेच हैद्राबाद गुजरात येथुन ताब्यात घेतले आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक समिर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग बाळासाहेब भालचिम यांचे मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी जितेंद्र शहाणे, पोलीस निरीक्षक वाई पोलीस ठाणे, तपासपथकाचे पोलीस उप निरीक्षक सुधिर वाळुंज, पोलीस अंमलदार राम कोळी, नितीन कदम, हेमंत शिदि, श्रावण राठोड व विशाल शिंदे यांनी केली आहे