तुळजापूरहून देवदर्शन करून परतताना गाडीची धडक; अपघातात एकाच कुटूंबातील 6 जण जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | तुळजापूर येथून देवदर्शन करून परतत असताना वाई तालुक्यातील ओझर्डे गावातील लटिंगे कुटूंबियांच्या गाडीची झाडाला भीषण धडक झाली. शनिवारी रात्री झालेल्या अपघातात कुटूंबातील सहा जण जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी दाखल खाण्यात आले.

सचिन लटिंगे (वय ४५), वैशाली लटिंगे (वय ४१), मंगल लटिंगे (वय ६५), प्रदीप लटिंगे (वय ३६), वर्षा लटिंगे (वय २६), यश लटिंगे (वय १८), रिया लटिंगे (वय ३). श्रावणी लटिंगे (वय ७, सर्व राहणार ओझर्डे, तालुका वाई) अशी किरकोळ जखमी झालेल्यांची व प्रवास करणाऱ्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, ओझर्डे गावातील लटिंगे कुटुंबातील सदस्य शनिवारी तुळजापूर येथे ओमनी गाडी क्र. (MH ११ CG ८६२६) मधून देवदर्शनासाठी गेले होते. दिवसभर देवदर्शन करून परतत असताना रात्री ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडीने एका झाडाला धडक दिली. यामध्ये कुटूंबातील ६ जणांना किरकोळ दुखापत झाली.

या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी जखमी झालेल्या प्रवाशांना सोमेश्वर नगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर या घटनेची नोंद सोमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे. अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.