सातारा प्रतिनिधी | मध्यरात्री एका रिसॉर्टमध्ये छमछम सुरू असताना अचानक पोलिसांनी छापा टाकला असता यावेळी 4 तरुणींसह 6 डॉक्टर दारुच्या नशेत अश्लिल कृत्य करताना आढळून आले. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत एकूण 8 जणांना ताब्यात घेतलं आहे. सातारा जिल्ह्यात पाचगणी कासवंड येथील स्प्रिंग रिसॉर्टवर मंगळवारी मध्यरात्री पोलिसांनी ही कारवाई केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील पाचगणी कासवंड गावाजवळ स्प्रिंग रिसॉर्ट नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमधील पाठीमागच्या हॉलमध्ये सांगली आणि पुण्यातून काही तरुणी आल्या आहेत. हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांसमोर तोकड्या कपड्यात वावरणे, अश्लिल हावभाव करणे, अंगविक्षेप करत नाचणे, असा प्रकार या तरुणींकडून केला जात असल्याने हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची संख्या देखील वाढली होती.
दरम्यान, या प्रकरणाची संपूर्ण माहिती साताऱ्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आचल दलाल यांना मिळाल्यानंतर त्यांनी हे प्रकरण गांभिर्याने घेत विशेष पथकाची नेमणूक करत कारवाईसाठी पाठवले.
विशेष पथकाने मंगळवारी रात्रीच्या सुमारास अचानक रिसॉर्टवर छापा टाकला. यावेळी तळमजल्यात सातारा जिल्ह्यातील 4 आणि मिरजचे एक असे 6 डॉक्टर दारुच्या नशेत तरुणींसोबत नाचताना आढळून आले.
याप्रकरणी पोलिसांनी हॉटेलचालकासह ४ तरुणी आणि ६ डॉक्टरांवर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. रिसॉर्टवर अचानक पोलिसांनी धाड टाकल्याचं कळताच आंबट शौकिनांचे चांगलेच धाबे दणादणले आहेत. याप्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.
‘ही’ आहेत अटक केलेल्या आरोपींची नावे…
सुरेश शिर्के व्यवसाय हॉटेल (वय 36, रा. पसरणी तालुका वाई), 2) उपेंद्र उर्फ कृष्णा दयावंत प्रशादकोल व व्यवसाय वेटर (वय 31, रा. स्प्रिंग व्हॅली रिसॉर्ट कासवंड ता. महाबळेश्वर), 3) रणजीत तात्यासाहेब काळे व्यवसाय डॉक्टर (वय 43, रा. बाजार पटांगण दहिवडी ता. माण), 4) निलेश नारायण सन्मुख व्यवसाय डॉक्टर (वय 39, रा. लक्ष्मी मार्केट , ता. मिरज), 5) प्रवीण शांताराम सैद व्यवसाय फार्मासिस्ट (वय 40, रा. आलडीया, माळुंगे पाडळे, ता. मुळशी), 6) मनोज विलास सावंत व व्यवसाय डॉक्टर (वय 40, रा. जयवंत नगर, दहिवडी ता. माण), 7) महेश बाजीराव साळुंखे व्यवसाय डॉक्टर (वय 40, रा. मलकापूर, ता. कराड), 8) राहुल बबन वाघमोडे व्यवसाय डॉक्टर (वय 31, रा. गोंदवले ता. माण जिल्हा सातारा), 9) हनुमंत मधुकर खाडे (वय 65, रा. दहिवडी ता. माण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.