पृथ्वीराज बाबांच्या माध्यमातून तालुक्यातील ‘या’ 6 प्रा. आरोग्य केंद्रांसाठी 6 कोटी 16 लाखांचा निधी उपलब्ध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असणाऱ्या आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्रांना स्मार्ट आरोग्य केंद्र प्रकल्पातून जिल्हा वार्षिक योजनेद्वारे तब्बल ६ कोटी १६ लाख रुपये इतका भरीव निधी मंजूर झाला आहे. याबाबतचा प्रशासकीय मान्यतेचा आदेश नुकताच पारीत झाला असून, आ. चव्हाण यांच्या पायाभूत व मूलभूत विकासाच्या संकल्पनेस यानिमित्ताने शिक्कामोर्तब झाल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मतदारसंघातील प्रत्येक घटकावर लक्ष ठेवून लोकांच्या मागण्या व त्यांच्याकडून येणाऱ्या समस्येवर ठोस पावले उचलली आहेत. त्यांची विकासाची प्रक्रिया राबविण्याची हातोटी कायम निराळी राहिली आहे. याची प्रचिती मतदारसंघातील तमाम मतदारांना येत आहे. रस्ते, पाणी या महत्त्वाच्या कामाबरोबर शिक्षण व आरोग्याच्या कार्यात त्यांचा बहुमोल वाटा आहे.

त्याचाच एक भाग म्हणून गतवर्षी त्यांनी जिल्हा वार्षिक योजनेद्वारे अकरा प्राथमिक आरोग्य केंद्रांना स्मार्ट आरोग्य केंद्र प्रकल्पातून निधी मिळावा, याकरिता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीचा प्रामुख्याने विचार करून सहा आरोग्य केंद्रांसाठी ६ कोटी १६ लाख रुपये इतका भरीव निधी मंजूर केला आहे.

‘या’ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश

रेठरे बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्र (९६ लाख ७७ हजार रुपये), काले प्राथमिक आरोग्य केंद्र (९१ लाख २३ हजार रुपये), हेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र (९७ लाख २५ हजार रुपये), सुपने प्राथमिक आरोग्य केंद्र (१ कोटी ८० लाख ८५ हजार रुपये), वडगाव हवेली प्राथमिक आरोग्य केंद्र (८० लाख ३० हजार रुपये) व कोळे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी (७० लाख रुपये) असा एकूण ६ कोटी १६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

6 कोटी 16 लाखांचा निधीतून ‘या’ सुविधा उभारल्या जाणार

केंद्र प्रकल्पातून जिल्हा वार्षिक योजनेद्वारे तब्बल ६ कोटी १६ लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्रातील महत्वाची कामे केली जाणार आहेत. त्यामध्ये नुतनीकरण, विस्तारीकरण, डागडुजी, रंगकाम, आधुनिकीकरण, काँक्रिट रस्ते, संरक्षक भिंत तसेच आवश्यकतेनुसार विद्युतीकरण यासह पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत.