कराड प्रतिनिधी | ओगलेवाडी (ता. कराड) येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी दागिने आणि रोख रक्कम मिळून 58 लाखांचा मुद्देमाल कराड शहर पोलिसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी एका सराईत गुन्हेगारासह त्याच्या साथीदारास अटक करण्यात आली आहे.
ओगलेवाडी ता. कराड येथे इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील खिडकीचा गज कापून दोरीच्या साह्याने घरात प्रवेश करून बेडरूमचा दरवाजा तोडून 110 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली होती. कराड शहर पोलिसांनी गुन्ह्याच्या मुळाशी जात दोन आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी सराईत गुन्हेगार विनायक काळे व त्याचा जावई सिद्धांत भोसले राहणार वडकुल तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या दोघांना अटक केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर ए ताशिलदार, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी केली आहे. हा यावेळी पोलीस निरीक्षक श्री सुंदर सहाय्यक पोलीस निरीक्षक भापकर सहाय्यक पोलीस निरीक्षक मावे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव सहाय्यक आदींनी कारवाईत भाग घेतला.