सातारा प्रतिनिधी । बोरगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण वादळे होते. याबाबत पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सूचना दिल्यानंतर बोरगाव पोलीस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गहाळ झालेले सुमारे साडे बारा लाखांचे ५५ मोबाईल नुकतेच शोधून काढले. मोबाईल हस्तगत केल्यानंतर ते मुळ मालकांना परत केले.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बोरगाव पोलीस ठाणे हद्दीतून गहाळ झालेले मोबाईल हस्तगत करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेतील तांत्रिक पथकाचे पोलीस अंमलदार बाळासाहेब जानकर, केतन जाधव यांनी सी.ई.आय.आर. पोर्टल व इतर तांत्रिक माहिती प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी राज्यातील व परराज्यातील मोबाईल मिळालेल्या लोकांशी नियमित संपर्क करुन माहिती घेतली. बोरगाव पोलीस ठाणे हद्दीतुन नागरिकांचे गहाळ झालेले एकुण १२ लाख ५० हजार रुपये किंमतीचे ५५ मोबाईल हस्तगत करण्यात यश आलेले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पोलीस उपाधीक्षक राजीव नवले यांचे मार्गदर्शनाखाली अशाच प्रकारे सातत्याने राबविण्यात येणार आहे. अशाप्रकारे बोरगाव गुन्हे प्रकटीकरण शाखेने सी.ई.आय. आर. पोर्टल व इतर तांत्रिक माहितीचे आधारे महाराष्ट्रातुन व इतर राज्यातुन नागरिकांचे गहाळ झालेले एकुण १२ लाख ५० हजार रुपये किंमतीचे ५५ मोबाईल हस्तगत करुन मुळ मालकांना परत करण्यात आले आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पोलीस उपनिरीक्षक राजीव नवले, यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र तेलतुंबडे, पो.हे. कॉ. जयवंत बुधावले, पो.ना.प्रशांत चव्हाण, सुनिल कर्णे पो.कॉ. बाळासाहेब जानकर, केतन जाधव, विशाल जाधव, सायबर पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदार पो.कॉ. महेश पवार, यशवंतराव घाडगे, ओंकार डुबल यांनी केली आहे.