सातारा प्रतिनिधी । ग्रामीण भागातील शेतकरी शेतीसोबत पशुपालनाचा जोडव्यवसाय करतो. या माध्यमातून त्याचा थोडाफार आर्थिक खर्चही भागतो. अशा पशुपालक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या पशु संवर्धन विभागाच्यावतीने अनेक खास योजना आणल्या जातात. अशीच एक राज्यस्तरीय योजना मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात अमलात आणली जाणार आहे ती म्हणजे शेतकऱ्यांना गाई आणि म्हैशी यांच्या खरेदी करायची असेल तर त्यांना 50 टक्के अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी सुनील बरकडे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.
सातारा जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या या नव्या योजनेबाबत अधिकारी बरकडे म्हणाले की, राज्य शासनाच्या पशु संवर्धन विभागाच्या माध्यमातून सन 2023-24 या वर्षात 02 देशी/संकरीत गाई किंवा 02 म्हशींचा गट वाटप करणे हि योजना सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुपालकांनी अर्ज करणे आवश्यक आहे.
शेती करताना त्याला जोडव्यवसाय म्हणून आपल्याला पशुपालन, शेळीपालन व्यवसाय करता येऊ शकतो. पशुपालनातून दुग्ध व्यवसाय करून त्यातून पैसे मिळवता येतात. तर शेळी पालनातूनही आर्थिक उत्पन्न मिळवता येते. अनेकदा चांगले दूध देणाऱ्या गाई, म्हशीं व इतर शेळींची खरेदी करताना आपल्याला सदर विक्रेत्याकडे जाणे मुश्किल होते. मात्र आता थेट पशुपालक अथवा शेळी विक्रेत्याकडून शेळी अथवा पशूंची खरेदी करता येणार आहेत. गुगलप्ले स्टोअरवरील Hello Krushi हे अँप इन्स्टॉल करून तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ शकता. यासोबत आपल्याला शेतीतील इतर व्यवसायासाठी शासनाकडून देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या योजनांची माहिती आदी गोष्टीही Hello Krushi अँपवर पाहता येतात.
हॅलो कृषी डाउनलोड करण्यासाठी Click here…
नेमके कसे आहे योजनेचे स्वरूप –
पशुधन विकास अधिकारी सुनील बरकडे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना राज्य सरकारच्या या शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरु केलेल्या योजनेचे स्वरूप सांगितले. ते म्हणाले की, मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर पहिल्या टप्प्यात सन 2023-24 या वर्षात सातारा जिल्ह्यामध्ये 2 देशी/ संकरीत गाई किंवा 2 म्हशींचा गट वाटप करणे ही योजना जिल्ह्यामध्ये सर्व प्रवर्गासाठी 50 टक्के अनुदानावर राबविण्यात येणार आहे. सदरचे अनुदान गाई / म्हैस गट खरेदी केल्यानंतर पहिल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यात 25 टक्के व दुसऱ्या सहा महिन्यात उर्वरित 25 टक्के याप्रमाणे लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : आता 50 टक्के अनुदानात खरेदी करा गाई अन म्हैशी pic.twitter.com/bKVwvDgXqR
— santosh gurav (@santosh29590931) June 16, 2023
असे असणार अनुदान –
2 दुधाळ गाई अथवा 2 दुधाळ म्हैशी यांच्यासाठी हि योजना असून 2 गाईसाठी 1 लाख 40 हजार विमा रक्कम पकडून 70 हजार रूपये + विमा कमाल अनुदान 8 हजार 425 रूपये किंवा 02 म्हैस गट खरेदीस 50 टक्के अनुदान रक्कम रुपये 80 हजार रूपये + विमा कमाल अनुदान 9 हजार 629 रूपये देय असणार आहे.
योजनेच्या कामासाठी ‘या’ व्यक्तींशी साधा संपर्क
राज्य शासनाच्या पशु संवर्धन विभागाच्या या नव्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर राज्य शासनाच्या ऐका व्यक्तीशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज, अर्जासोबत सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे व योजनेच्या सविस्तर माहितीसाठी पशुधन विकास अधिकारी विस्तार संबंधित पंचायत समिती यांचेशी संपर्क साधलयास आपल्याला योजनेची माहिती व अर्जाची प्रक्रिया करता येईल.
अर्ज करण्यासाठी ‘हि’ आहे शेवटची तारीख
राज्य शासनाच्या पशु संवर्धन विभागाच्याच वतीने सुरु करण्यात आलेल्या या योजनेसाठी शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे. यासाठी ठराविक कालावधी ठेवण्यात आलेला आहे. अर्ज हा दि. 17 जून 2023 ते 17 जुलै 2023 या कालावधीत अर्ज करता येणार आहे. तब्बल एक महिन्याचा कालावधी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी ठेवण्यात आलेला असल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी सुनील बरकडे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली.