सातारा प्रतिनिधी | हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजे महाशिवरात्री हा देशभरात उत्साहात साजरा केला जाता. शिवभक्तांसाठी हा दिवस जणू काही दसरा दिवाळीच होय. महाशिवरात्रीस 8 मार्च रोजी रात्री 09.57 वाजेपासून सुरुवात होणार असून 9 मार्च संध्याकाळी 06.17 वाजेपर्यंत आहे. उदय तिथीनुसार महाशिवरात्री 8 मार्च 2024 ला साजरी करायची आहे. या निमित्त सातारा जिल्ह्यात असलेल्या महादेवाच्या तीर्थक्षेत्रास भाविकांना भेट देता यावी म्हणून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा सातारा विभागाच्या वतीने एसटी बसेसची सोय करण्यात आली आहे.
महाशिवरात्रीनिमित्त राज्य परिवहन विभाग सज्ज झाला आहे. सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध अशी पाटेश्वर, लिंब गोवे, यवतेश्वर, सागरेश्वर, तांदुळवाडी, शिंगणापूर, सोमायचे करंजे, दांडेघर, क्षेत्र महाबळेश्वर, धारेश्वर, मेरुलिंग, सिध्देश्वर कुरोली ठिकाणे आहेत. त्या ठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी ५० जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
महाशिवरात्रीनिमित्त सातारा ६, कराड ७, कोरेगाव २, फलटण ७, वाई ३, पाटण ३, दहिवडी ४, महाबळेश्वर ८, मेढा ३, पारगाव- खंडाळा २, वडूज ५, अशा मिळून आहेत. सातारा आगाराच्या बसेस पाटेश्वर, लिंबगोवे व यवतेश्वर ये मार्गावर, कराड आगाराच्या बसेस सागरेश्वर, शिंगणापूर मार्गावर, नि. कोरेगाव आगाराच्या बसेस राजवाडा तांदुळवाडी मार्गावर,
वाई आगाराच्या वाई-दांडेघर- पाचगणी, क्षेत्र महाबळेश्वर मार्गावर, दहिवडी आगाराच्या ल शिंगणापूर मार्गावर, महाबळेश्वर आगाराच्या क्षेत्र महाबळेश्वर मार्गावर, मेढा आगाराच्या क्षेत्रमहाबळेश्वर, पारगाव-खंडाळा आगाराच्या सोमायचे करंजे मार्गावर, वडूज आगाराच्या सिध्देश्वर कुरोली, शिंगणापूर बसेस मार्गावर धावणार आहेत.