कराड दक्षिणेत फुललं कमळ!; पृथ्वीराज चव्हाण यांच्या पराभवाची 5 कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचा हक्काचा बालेकिल्ला कोणता म्हणाला लागेल तर तो कराड दक्षिण विहंसभा मतदार संघ होय. या ठिकाणी काँग्रेसची एकहाती सत्ता होती. मात्र, विधानसभा निवडणूक २०२४ लागली आणि निवडणुकीत भाजपच्या डॉ. अतुल भोसलेंनी हा बालेकिल्ला काबीज केला. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचा विचारांचा वारसा सांगणाऱ्या कराडचा कृष्णाकाठ होय. मागच्या काही दिवसात हा कृष्णाकाठ चांगला खवळला. या याठिकाणी विधानसभा निवडणुकीत दोन बाबांच्यात टक्कर झाली. आणि दोन्ही बाबांपैकी अतुलबाबा विजयी झाले. पंतप्रधानांचा सल्लागार राहिलेला आणि मुख्यमंत्री म्हणून राज्य सांभाळलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांना अखेर पराभवाचा सामना करावा लागला. एवढा बडा माणूस लहानशा विधानसभेला कसा काय पडला? त्याचीही काही कारण आहेत..

कराड दक्षिण विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये आज काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा पराभव झाला आहे, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना सुमारे 1 लाख 409 मते मिळाली तर डॉ. अतुलबाबा भोसले यांना 1 लाख 39 हजार 904 मते मिळाली आहेत. सुमारे 38 हजार 364 मतांनी त्यांनी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला आहे.

सात दशकांमध्ये प्रथमच पराभव…

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मागील सात दशकांमध्ये प्रत्येक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला होता. मागील दोन विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधीत्व केले होते. तर त्यापूर्वी 1980 च्या दशकापासून सन 2014 पर्यंत स्व. विलासराव पाटील उंडाळकर यांनी सलग 35 वर्ष विधानसभेत प्रतिनिधीत्व केले होते. त्यापूर्वी स्वातंत्र्यापासून 1980 पर्यंत स्व. यशवंतराव मोहिते यांनी सलग सहा काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजय मिळविला होता.

पराभवाच पहिलं कारण सांगता येईल ते म्हणजे गाफीलपणा…

खरं तर लोकसभेपासूनच पृथ्वीराज चव्हाण हे गाफील राहिल्याचं दिसलं… लोकसभा निवडणुकीत कराड दक्षिण मधून महायुतीच्या उदयनराजे भोसले याना मिळालेली आघाडी हीच पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जात होती.. मात्र त्यातून पृथ्वीराज चव्हाण यांनी जास्त असा काही बोध घेतल्याचं दिसलं नाही… लोकसभा निवडणुकीत उदयराजेना मिळालेल्या आघाडीनंतर पृथ्वीराज चव्हाणांनी जोमाने कामाला लागायला हवं होतं, मात्र तस काही चित्र कराड दक्षिणेत दिसलं नाही..

पराभवाचं दुसरं कारण म्हणजे मतदारसंघात दुर्लक्ष

पृथ्वीराज चव्हाण हे तस बघितलं तर राज्याच्या राजकारणातील दिग्गज नेते.. काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेते.. त्यामुळे कराड दक्षिण मधून जरी निवडून आले असले तरी त्यांचा अधिकचा वेळ हा मुंबईत जात असे. राज्य काँग्रेसच्या अनेक महत्वाच्या बैठकांना त्यांना हजेरी लावावी लागत असते.. महाविकास आघाडीने जो जाहीरनामा यंदाच्या निवडणुकीपूर्वी बनवला होता, त्याचे अध्यक्षही पृथ्वीराज चव्हाण हेच होते.. त्यामुळे मतदारसंघात त्यांचं दुर्लक्ष्य झाल.. खास करून कराड दक्षिण मधील ग्रामीण भागात पृथ्वीराज चव्हाण यांचा संपर्क कमी झळा होता. त्याचा फटका त्याना निवडणुकीत बसला…

पराभवाचं तिसरं कारण म्हणजे बेरोजगारीचा विषय

पृथ्वीराज चव्हाण हे मागील १० वर्ष कराड दक्षिणचे आमदार होते.. मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केलं.. मात्र या काळात कराड दक्षिण मध्ये त्यांनी तरुणांना रोजगार दिला नाही, याउलट आम्ही मात्र रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतोय आ प्रचार भाजप उमेदवार अतुल भोसले आपल्या प्रत्येक भाषणात करत होते… या मुद्द्याला टॅकल करणं पृथ्वीराज चव्हाण याना अखेरपर्यंत जमलं नाही.. त्यामुळे लोकांच्या मनातही पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल चुकीचं नॅरेटिव्ह पसरलं.. त्याचा फटका त्यांना बसला..

पराभवाचं चौथ कारण म्हणजे अँटी इंकंबसी

पृथ्वीराज चव्हाण हे मागील १० वर्षांपासून कराड दक्षिणचे आमदार राहिलेत, मात्र जी विकासकामे त्यांनी २०१४ ते २०१९ च्या दरम्यान केली होती… तशी कामे त्यांना मागच्या ५ वर्षांत करता आली नाहीत.. कराड मधील अनेक गावातील रस्ते आजही खराब आहेत… मतदारसंघात नवीन असा कोणताही प्रकल्प आला नाही.. . त्यातच त्यांच्याबद्दल असलेल्या अँटी इंकंबसिचा फटका निवडणुकीत बसताना दिसला…

पराभवाचं पाचवं कारण म्हणजे भाजपने जोमाने केलेला प्रचार…

खरं तर लोकसभा निवडणुकीपासूनच भाजपने कराड मध्ये विधानसभेच्या प्रचाराला सुरुवात केली होती.. सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रचार तर जोरात सुरु होताच, मात्र ग्राउंड वर सुद्धा एकेक मतांसाठी भाजपने जोर लावला होता. बूथ टू बूथ कार्यकर्त्यांची फळी तर भाजपकडे होतीच… याशिवाय प्रत्येक गावातील बडा पुढारी अतुल भोसले यांच्यासोबत उभा राहिला.. महायुती सरकारने राबवलेल्या अनेक योजना प्रत्येक घराघरात पोचवण्यात अतुल भोसले यशस्वी ठरले होते, त्यातच लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचं एकगट्टा मतदान सुद्धा अतुल भोसले यांनाच मिळताना दिसलं…