जिल्ह्यात हत्तीरोगाचे थैमान! कराड, माणसह 6 तालुक्यात आढळले 47 रुग्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील 8 तालुक्यांमध्ये सध्या हत्तीरोगाने चांगलेच थैमान घातले आहे. या रोगाचे तब्बल ४७ रुग्ण सक्रिय झाले आहेत. या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा आरोग्य व हिवताप विभागाने हत्तीरोग निर्मूलनासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

लिम्फॅटिर फायलेरियासिस (एलएफ) हा डास चावल्यानंतर एखाद्या व्यक्तीला हत्तीरोगाचे संक्रमण होते. हा आजार झाल्यानंतर रुग्णांचे पाय आकाराने जाड होतात व रुग्णास हालचाल करणे अवघड होऊन बसते. हत्तीरोग हा शरीर विद्रूप करणारा रोग आहे. जिल्हा आरोग्य विभाग व हिवताप विभागाच्या नोंदीनुसार जिल्ह्यात हत्तीरोग बाधित रुग्णांची संख्या ४७ इतकी आहे. या रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ‘राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण’ कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग रुग्ण शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे.

सातारा, कोरेगाव, महाबळेश्वर, न खंडाळा, कराड, फलटण, माण व ने खटाव तालुक्यांतील ५ हजार ९७५ नागरिकांच्या रक्ताचे नमुने संकलित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दि. १९ जूनपासून २ हजार १०० नमुने संकलित झाले आहेत. या संपूर्ण मोहिमेचे पर्यवेक्षण पुणे येथील हत्तीरोग सर्वेक्षण पथकाद्वारे केले जात आहे.

५९७५ नागरिकांच्या रक्ताचे नमुने संकलित केले जाणार

शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यातील आठ तालुक्यात या मोहिमेंतर्गत दि. १९ ते २६ जून या कालावधीत आठ तालुक्यांमधील ५ हजार ९७५ नागरिकांच्या रक्ताचे नमुने संकलित केले जाणार आहेत.

‘या’ वेळेत राबविली जातेय रक्त संकलन मोहीम

ज्या व्यक्तीला हत्तीरोगाची लागण झाली आहे, त्या व्यक्तीच्या रक्तात ‘मायक्रो फायलेरिया’, हे जंतू आढळून येतात. रात्री झोपल्यानंतर रक्ताभिसरण प्रक्रिया सुरू होते. अशावेळी रक्ताचा नमुना घेतल्यास त्या व्यक्तीला हत्तीरोग झाला आहे की नाही, याचे निदान करता येते. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभाग व हिवताप विभागाकडून जिल्ह्यात रात्री ८ ते १२ या वेळेत रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले जात आहेत.

अशी आहेत हत्तिरोगाची लक्षणे…

थंडी वाजणे, ताप, पाय दुखणे, सुजणे, वृषण आकाराने जाड होणे, पाय हत्तीच्या पायांसारखे जाड व मोठे होणे व हालचाल मंदावणे ही या हत्तीरोगाची लक्षणे आहेत.