सातारा प्रतिनिधी । शासनाच्या ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत पाणीपुरवठा योजनेची देखभाल, दुरुस्ती करण्यसाठाई नळ जलमित्रांची नियुक्ती करण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्यातील १ हजार ४९२ ग्रामपंचायतींमध्ये गवंडी, प्लंबर, मोटर मेकॅनिक, फिटर व इलेक्ट्रिशियन, पंप ऑपरेटर यानुसार तीन नल जल मित्रांची नियुक्ती करण्यात येणार असून यासाठई आतापर्यंत १ हजार ८५८ अर्ज जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाले आहेत. सुमारे साडेचार हजार जणांना यातून कामावर मोबदला दिला जाणार आहे.
‘जलजीवन मिशन’ अंतर्गत पाणीपुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती योग्य रितीने व्हावी, या उद्देशाने ग्रामीण भागात ग्रामपंचायतीमध्ये तीन नल जलमित्रांची निवड करण्या शासनाकडून घेण्यात आला. त्यानुसार प्रत्येक पदासाठी तीन याप्रमाणे नऊ उमेदवारांची नामनिर्देशने राज्यस्तरावर करण्यासाठी ग्रामपंचायतीने माहिती घेऊन अॅपवर भरण्याचे आवाहन देखील करण्यात आले असून त्यानुसार अर्ज भरण्याची कार्यवाही सुरु झाली आहे.
ग्रामपंचायतीने सादर केलेल्या नामनिर्देशनामधून राज्यस्तरावर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर संबंधितांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असून प्रशिक्षणानंतर जल मित्रांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
नल जलमित्रासाठी अर्ज स्वीकारणे सुरू…
या योजनेत कामाच्या प्रमाणात जलमित्राला मोबदला मिळणार आहे. यासाठी पात्र व्यक्तीने ग्रामपंचायतीत अर्ज करायचा आहे. त्यानंतर पंचायत समितीत अर्ज येणार असून त्यानंतर शासनाच्या लिंकवर नाव नोंदणी केली जाणार आहे.
आतापर्यंत अर्ज किती आले…
सातारा तालुका : १९२ ग्रामपंचायतीत २३४ अर्ज
कोरेगाव तालुका : १४२ ग्रामपंचायतीत १४२ अर्ज
खटाव तालुका : १३२ ग्रामपंचायतीत १६५ अर्ज
माण तालुका : ९५ ग्रामपंचायतीत २१० अर्ज
फलटण तालुका : १३० ग्रामपंचायतीत २९६ अर्ज
खंडाळा तालुका : ६३ ग्रामपंचायतीत ७ अर्ज
वाई तालुका : ९९ ग्रामपंचायतीत ९७ अर्ज
जावळी तालुका : १२५ ग्रामपंचायतीत १६० अर्ज
महाबळेश्वर तालुका : ७९ ग्रामपंचायतीत ७९ अर्ज
कराड तालुका : २०० ग्रामपंचायतीत ६७ अर्ज
पाटण तालुका : २३६ ग्रामपंचायतीत २३८ अर्ज